महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलन
महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलन २००८सालापासून खानवडी ता. पुरंदर, या महात्मा फुले यांच्या मूळगावी घेतले जाते.राज्यस्तरीय संमेलनाला आत्तापर्यंत कवी विठ्ठल वाघ, प्राचार्य शिवाजीराव भोसले, भाई वैदय हे उदघाटक म्हणून लाभले. साहित्यमार्तंड यशवंतराव सावंत, इतिहासाचार्य प्रा.मा.म.देशमुख, प्रा. रतनलाल सोनग्रा, बबन पोतदार, श्रीमंत कोकाटे, डॉं. जयप्रकाश घुमटकर, डॉं. जब्बार पटेल, रमेश मेश्राम, दशरथ यादव, शरद गोरे, डॉं एस.डी.नाईक हे संमेलनाध्यक्ष म्हणून लाभले आहेत....अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीने हे संमेलन दरवर्षी २७ नोव्हेंबरच्या सुमारास घेतले जाते.
२०१३साली ६वे राज्यस्तरीय महात्मा फुले प्रबोधन साहित्य संमेलन २७ नोव्हेंबरला झाले. संमेलनाध्यक्ष कवी म.भा. चव्हाण होते. मराठी साहित्य संमेलनाची परंपरा ही जुनी असली तरी महात्मा फुले यांच्या नावाने सुरू असलेल्या या साहित्य संमेलनाला सामाजिक प्रबोधन आणि परिवर्तन त्याचप्रमाणे सत्यशोधकी विचारांची कास धरून अशा संमेलनातून एक वेगळा विचार समाजामध्ये प्रतिबिंबित करणे त्याचप्रमाणे सामाजिक समतेचा विचार सर्वश्रूत करणे अशा प्रकारची मानसिकता यामागे नक्कीच आहे
पहा
संपादनसाहित्य संमेलने; महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलन, पुरंदर