मल्हार कोळी हा महाराष्ट्रातील एक समाज आहे. ह्या समाजातील लोक मल्हारीचे भक्त असल्यामुळे त्यांना हे नाव पडले. पणभरी कोळी आणि मल्हार कोळी या दोन भिन्न भिन्न जाती आहेत. पाणीभरे कोळी हे एसबीसी या प्रवर्गातील मोडतात तर मल्हार कोळी अनुसूचित जमाती कायदा १९५० च्या ३० क्रमांकाच्या अनुसूची मध्ये आहेत. तिथे पाणीभरे कोळी असा उल्लेख नसून केवळ कोळी मल्हार - ३० असाच उल्लेख आहे. मल्हार कोळी ठाणे, पालघर नाशिक रायगड या सह्याद्रीला अगदी जवळ असलेल्या जिल्ह्यांमध्ये आढळतात. यांच्यात मोरे, चंडोल,भोटकर, दांडगे, मढवी, भोईर, जाधव, तुंबडा, , घाटाळ, तांडेल, मातेरा, सुतार, केरव,केशव,डमाले,खापरे,वाघमारे,निसाल,भालके, लांघी, पोवार, शेलार, धांगडा, हाडल, बुंधे, सोज्वळ, सातवी, ठाकरे, वावरे, वेखंडे, भालके, सरनोबत, वाडेकर, मरवट, गवे, गोऱ्हे, गुळवी, जाधव, कोशिंबे, गवारी, करांदे, लांघी, केंगे निरगुडा, ही आडनावे आढळतात.मल्हार कोळ्यांपैकी बरेचजण शेती करतात.