मल्लीनाथ महाराज १९६२ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तत्कालीन आमदार देवीसिंग चव्हाण यांचा औसा विधानसभा मतदारसंघातून पराभव करून विधानसभेवर आमदार म्हणून निवडून गेले. खादी आणि ग्रामोद्योग यांसाठी त्यांनी मराठवाड्यात उल्लेखनीय कार्य केले होते. ते किल्लारी सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक संचालक होते. प्रदेश काँग्रेस कमिटीवर उपाध्यक्ष, मराठवाडा विद्यापीठाचे सेनेट सदस्य, ज्येष्ठ कलाकार कमिटीचे अध्यक्ष तसेच १६वेळा औसाचे नगराध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले. या काळात त्यांनी भरीव विकासात्मक कामे केली. आमदार असताना वीज, पाणी, रस्ते यांसह अनेक मूलभूत सेवा त्यांनी तालुक्यात आणल्या. विविध जडण-घडण-दळण-वळणाला जोडणारी कामे त्यांनी केली. मल्लीनाथ महाराजांनी लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीवर संचालक म्हणून काम केले. औसाला कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापना करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. कुमार स्वामी महाविद्यालय, मुक्तेश्वर विद्यालयांसह विविध संस्थांचे अध्यक्षपदही त्यांनी सांभाळले. इंदिरा गांधी व यशवंतराव चव्हाण यांच्या सहवासातून काँग्रेसचे राजकारण तसेच धर्मकारण करणारे मल्लीनाथ महाराज हे काँग्रेसचे निष्ठावंत नेते होते. औसा नाथसंस्थानचे चौथे पीठाधिपती कै. ज्ञानेश्वर महाराज यांचे ते थोरले बंधू, विद्यमान पीठाधिपती गुरूबाबा महाराज व अध्यक्ष गहिनीनाथ महाराज यांचे ते चुलते होते.


[]

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ "मल्लीनाथ महाराज यांचे निधन".[permanent dead link]