चतुरंग बदक

(मलार्ड या पानावरून पुनर्निर्देशित)

चतुरंग बदक अथवा नुसतेच चतुरंग. (शास्त्रीय नाव - Anas platyrhynchos Linnaeus) हे बहुधा सर्वात सुंदर बदक असावे. भारतात हे बदक मुख्यत्वे स्थलांतरित आहे. उत्तरी भारतातील पाणथळी जांगामध्ये हिवाळ्यात हे मोठया प्रमाणात स्थलांतर करून येते. या पक्ष्यांना युरोपातीलसायबेरियातील स्थानिक पक्षी मानण्यात येते.. भारतातील यांचा आढळ उत्तरी भारतापुरताच मर्यादित आहे. देशाच्या दक्षिणेकडे हा पक्षी नसल्यात जमा आहे.

मलार्ड बदक(नर)
Anas platyrhynchos

सवयीसंपादन करा

हा पक्षी मुख्यत्वे शाकाहारी असून, पाणथळी जागातही दलदलीची व कमी खोल जागा पसंत करतो. पाण्यात पोहोताना शेपूट वर करून मादीला पटवण्याचे काम सातत्याने चाललेले असते. इतर बदकांच्या मानाने याचा उडण्याचा वेग जास्त आहे त्यामुळे शिकार्‍यांना याची शिकार करणे साहसी वाटते.

इतर नावेसंपादन करा

हिंदी, बंगाली- नीलसीर

सिंधी- नीरागी, हिरागी,

कच्छ- राजे

संदर्भसंपादन करा