मराठी समाजशास्त्र परिषद
विकिपीडियाचा दर्जा राखण्यासाठी या लेखास किंवा विभागास विकिकरणाची गरज आहे. उपयुक्त विकिदुवे देऊन या लेखाचे विकिकरण करण्यास कृपया मदत करा]. संक्षिप्त मार्गदर्शन दाखवा
|
मराठी समाजशास्त्र परिषदेचे २३वे राज्यस्तरीय अधिवेशन १८-१९ जानेवारी २०१३ला कोल्हापूर येथे होणार आहे. उद्घाटक कोल्हापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन.जे. पवार असतील. बीजभाषण नेहरू विद्यापीठातील अभ्यासक डॉ नंदू राम करतील. अधिवेशनाचे विषय : सीमांतिक उपेक्षत समूह (मुख्य विषय), अन्य विषय - शिक्षणाचे बाजारीकरण, कृषि धोरण, प्रसारमाध्यमे आदींचा उपेक्षित समूहांवर होणारे परिणाम.
महाराष्ट्र समाजशास्त्र परिषदेची यापूर्वीची अधिवेशने
संपादनमराठी समाजशास्त्र परिषदेचे ३० वे अधिवेशन मराठी समाजशास्त्र परिषद व तक्षशिला महाविद्यालय अमरावती यांच्या संयुक्त विध्यमाने दिनांक २३ व २४ जानेवारी २०२० लामरावती येथे पार पडले. या अधिवेशनाला उदघाटक म्हणून संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर व बीजभाषक म्हणून प्रोफेसर आनंदकुमार माजी अध्यक्ष इंडियन सोसिओलॉजिकल सोसायटी हे होते. मराठी समाजशास्त्र परिषदेचे पदाधिकारी डॉ. सरोज आगलावे अध्यक्ष, डॉ. दीपक पवार सचिव आणि कोषाध्यक्ष डॉ. राहुल भगत , तक्षशिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मल्लू पडवळ व संयोजिका डॉ. अंजली वाठ उपस्थित होत्या.
पहा : महाराष्ट्रातील परिषदा