मराठी एकीकरण समिती - महाराष्ट्र राज्य (Marathi Ekikaran Samiti - Maharashtra Rajya) हे एक महाराष्ट्र राज्यातील बिगराजकीय संघटन आहे. ही लोकचळवळ मराठी अस्मितेसाठी, मराठी भाषा, मराठी माध्यमातील शिक्षण, स्थानिक मराठी माणसांचा रोजगार यासाठी ६ जून २०१५ पासून महाराष्ट्रात कार्यरत आहे.[ संदर्भ हवा ] या समितीचे ब्रीद वाक्य - 'एकच ध्येय, एकच ध्यास, मराठी भाषा, मराठी शाळा, राज्य संस्कृतीचे संवर्धन व विकास' असे आहे.

संघटनेचे मूळ ध्येय मराठी माणसांना एकत्र आणून उद्योग क्षेत्रात मराठी माणसाची मोठी फळी उभारावी हे आहे. राज्यात होणाऱ्या मराठी भाषेच्या गळचेपी विरोधात आवाज उचलण्यासाठी कायदेशीर लढा देणे, आंदोलने करणे, मराठी हा विषय राजकारणापुरता नसून राजकारणाचा वापर मराठी संवर्धनसाठी केला पाहिजे हे संघटनेचे धोरण आहे.[ संदर्भ हवा ] ही संघटना सर्व राजकीय पक्षांना, राज्यातील जनतेला मराठी भाषेविषयी, मराठी शाळांविषयी जागरूक करण्याचे काम करत आहे. या महाराष्ट्रात धर्म, जात, राजकीय पक्ष बाजूला ठेवून मराठीसाठी कार्य करणारी ही बिगराजकीय संघटना आहे. मराठी एकीकरण समिती संघटनेची सध्या २२,०००हून जास्त सभासद प्रामुख्याने मुख्य शहरात आहेत.[ संदर्भ हवा ]

संघटनेचे मार्गदर्शक माजी आय एफ एस अधिकारी, माजी पोलीस अधिकारी, काही कायदेतज्ज्ञ तसेच सामाजिक क्षेत्रातील काही मोठी नेते मंडळी आहेत.[ संदर्भ हवा ]

अधिकृत संकेतस्थळ संपादन

https://www.marathiekikaransamiti.org Archived 2018-11-01 at the Wayback Machine.