मनोहर मारोतीराव तल्हार (जन्म : १४ अाॅक्टोबर १९३२; - १५ फेब्रुवारी २०१८) हे एक मराठी लेखक होते. मुळचे अमरावतीचे असलेले तल्हार यांचे शिक्षण अमरावतीतच ए.व्ही स्कूलमध्ये झाले. ते विक्रीकर खात्यात नोकरीला होते. कारकून म्हणून नोकरीला लागल्यावर त्यांनी उच्च शिक्षण घेतले व नंतर ते त्याच खात्यात अधिकारी झाले.

वास्तववादाच्या अगदी जवळ जाणारी त्यांची 'माणूस' ही कादंबरी मराठी साहित्यात खूप गाजली. तिच्यावर दूरचित्रवाणी मालिकाही निघाली. त्यांनी त्यांच्या साहित्यात वऱ्हाडी बोलीचा भरपूर उपयोग केला. वऱ्हाडी बोली व भाषेची महती सांगणाऱ्या अनेक कार्यक्रमांत ते सहभागी होत असत.

मनोहर तल्हार यांनी लिहिलेली पुस्तके

संपादन
  • अशरीरी (कादंबरी)
  • उलूक (कथासंग्रह)
  • कॅन्सल (कथासंग्रह)
  • गोरीमोरी (कथासंग्रह)
  • तोलरेघ (कथासंग्रह)
  • दुजा शोक वाहे (कादंबरी)
  • दूरान्वय (कथासंग्रह)
  • निःसंग (कथासंग्रह)
  • प्रिया (कादंबरी)
  • बुढीचं खाटलं (कथासंग्रह)
  • माणूस (कादंबरी)
  • शुक्रथेंब (कादंबरी)
  • श्वेतांबरी (कविता संग्रह)

मनोहर तल्हार यांना मिळालेले पुरस्कार आणि सन्मान

संपादन
  • 'माणूस'साठी महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार
  • अंभोरा येथे झालेल्या विदर्भ साहित्य संघाच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद