मदर (श्रीमाताजी चरित्र)

मदर हे श्रीमाताजींचे मराठी चरित्र आहे. श्री.लक्ष्मीकांत बनसोड यांनी हे चरित्र लिहिले आहे.

मदर
लेखक लक्ष्मीकांत वि. बनसोड
भाषा मराठी
देश भारत
साहित्य प्रकार चरित्र
प्रकाशन संस्था श्री अरविंद प्रकाशन, ठाणे
प्रथमावृत्ती १९९६
विषय श्रीमाताजी ऊर्फ मीरा अल्फासा यांचे चरित्र
पृष्ठसंख्या १३३

पुस्तकाची मांडणी

संपादन

दोन शब्द या प्रकरणात लेखकाने हे पुस्तक लिहिण्यामागची प्रेरणा स्पष्ट केली आहे.

या पुस्तकात एकंदर पंधरा प्रकरणे आहेत.

पुस्तकाचे वेगळेपण

संपादन
  • चरित्रामध्ये सहसा बाह्य, दृश्य घटना प्रसंग यांवर अधिक भर दिलेला असतो. पण या चरित्रामध्ये श्रीमाताजींच्या आंतरिक जीवनाचे विवरण देखील आलेले आहे. ही गोष्ट महत्त्वपूर्ण आहे. पेशी - एक प्रयोग आणि शरीरांतर ही दोन प्रकरणे या दृष्टीने महत्त्वाची आहेत.
  • प्रत्येक प्रकरणाच्या सुरुवातीला श्रीमाताजीकृत एक प्रार्थना मराठीत अनुवादित करून दिली आहे.
  • लिखाणासाठी सुसंगत अशा छायाचित्रांची जोड दिली आहे.
  • परिशिष्टामध्ये श्रीमाताजींच्या जीवनातील महत्त्वाच्या घटनांच्या नोंदी दिल्या आहेत.
  • परिशिष्टामध्ये श्रीमाताजींच्या प्रतीकाची माहिती दिली आहे. []

संदर्भ

संपादन
  1. ^ मदर, श्री. लक्ष्मीकांत बनसोडे.