मढे घाट हे पुणे जिल्ह्याच्या दक्षिण भागातल्या वेल्हे तालुक्यातील गाव आहे. या घाटाकडे जाण्यासाठी मुंबई-बंगलोर या राष्ट्रीय महामार्गावरून नसरापूर येथून वेल्हा मार्गे केळद या गावी जातात. केळद गावापासून चालत दीड ते दोन किलोमीटरवर मढे घाट येतो. [१]
मढे घाट हे एक नैसर्गिक पर्यटन स्थळ आहे. येथून कुठलाही रस्ता जात नाही. तेथे मोठ्ठा धबधबा आहे. पावसाळ्यात त्याला खूप पाणी असते ऑक्टोबरनंतर मात्र टिपूसही पाणी नसते. धबधबा कड्यावरून उतरतो, तेथून कडा उतरून पायी महाडच्या दिशेने जाता येते, पावसाळ्यात सहलीला खूप गर्दी असते.

डोंगर-दऱ्या भटकण्याऱ्यांसाठी पुण्यहून येणाऱ्यांना ‘केळद-मढे घाट-उपांड्या घाट’ ही एक उत्तम चढाई असते. कोकणातील ट्रेकर्स शिवथरघळ- गोप्या घाट – केळद- मढे घाट- कर्णावाडी- रानवाडी -शिवथरघळ असा मार्ग निवडतात.
सिहगड जिंकून घेणाऱ्या तानाजी मालुसरे यांचे मढे त्यांच्या कोकणातल्या गावी या वाटेने नेले म्हणून त्याला मढे घाट म्हणतात अशी आख्यायिका आहे.[२][३]

पाहा : १. महाराष्ट्रातील घाट रस्ते

२. मढे घाट

संदर्भ संपादन

  1. ^ "Madhe Ghat (Pune) - 2019 What to Know Before You Go (with Photos)". TripAdvisor (इंग्रजी भाषेत). 2019-06-11 रोजी पाहिले.
  2. ^ "Road Trip to Madhe Ghat Waterfall – Places near Pune and Mumbai" (इंग्रजी भाषेत). 2019-06-11 रोजी पाहिले.
  3. ^ "मढ़े घाट कब और कैसे जाएं". Hindilogy. Archived from the original on 2019-12-13. 17 March 2020 रोजी पाहिले.