मंचिर्याल
मंचिर्याल (Mancherial) हे भारताच्या तेलंगणा राज्याच्या मंचिर्याल जिल्ह्याचे मुख्यालय आहे. हे गोदावरी नदीच्या उत्तर तीरावर आहे. हे राज्याची राजधानी हैदराबादपासून सुमारे २४४ किलोमीटर (१५२ मैल), करीमनगरपासून ८४ किलोमीटर (५२ मैल) आणि आदिलाबादपासून १५५ किलोमीटर (९६ मैल) अंतरावर आहे. मंचिर्याल जिल्हा हा पूर्वीच्या आदिलाबाद जिल्ह्यापासून बनलेला आहे.

?मंचेरियल मंचिर्याल तेलुगू :మంచిర్యాల तेलंगणा • भारत | |
— शहर — | |
![]()
| |
गुणक: 18°52′4.35″N 79°27′50.18″E / 18.8678750°N 79.4639389°E |
|
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
क्षेत्रफळ • उंची |
२८.०८ चौ. किमी • १५४ मी |
हवामान • वर्षाव |
• १,०७४.९ मिमी (४२.३२ इंच) |
प्रांत | तेलंगणा |
जिल्हा | मंचिर्याल जिल्हा |
लोकसंख्या • घनता |
८७,१५३ • ३,१०४/किमी२ |
भाषा | तेलुगू |
संसदीय मतदारसंघ | पेद्दपल्ली |
विधानसभा मतदारसंघ | मंचिर्याल |
स्थानिक प्रशासकीय संस्था | मंचिर्याल नगरपालिका |
कोड • पिन कोड • दूरध्वनी • UN/LOCODE • आरटीओ कोड |
• 504208 • +०८७३६ • IN-MNCL • TS-19[१] |
संकेतस्थळ: मंचिर्याल नगरपालिका |
तेलंगणा सरकारने सिंगरेनी कॉलीअरीज कंपनीची स्थापना करून कोळशाच्या खाणीतून कोळसा निर्मितीस सुरुवात केल्यानंतर प्रदेशात औद्योगिकीकरण झाले. १९७० च्या दशकात येथे एक औद्योगिक प्रशिक्षण संस्था देखील उघडण्यात आली.[२]
लोकसंख्या
संपादन२०११ च्या जनगणनेनुसार, शहराची लोकसंख्या ८७,१५३ होती. सरासरी साक्षरता दर ७५.७१% होता.[३]
परिसरातील बहुसंख्य लोक हिंदू धर्म पालन करतात, त्यानंतर इस्लाम आणि ख्रिश्चन धर्माचे. तेलुगू ही सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे.
भुगोल
संपादनमंचिर्याल हे उत्तर अक्षांशाच्या १८°५२′४.३५″N आणि पूर्व रेखांशाच्या ७९°२७′५०.१८″E वर स्थित आहे. हे गोदावरी नदीच्या उत्तर तीरावर आहे. हे गोदावरी नदीच्या उत्तर सीमेवर वसलेले आहे. मंचिर्यालची सरासरी उंची १५४ मीटर आहे.[४] वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०७४.९ मिलिमीटर (४२.३२ इंच) आहे.[५]
प्रशासन
संपादनमंचिर्याल नगरपालिका ही शहराच्या नागरी गरजांवर देखरेख करणारी नागरी संस्था आहे. सध्या नगरपालिकेचे कार्यक्षेत्र २८.०८ किमी२ (१०.८४ चौरस मैल) मध्ये पसरलेले असून ३४ प्रभाग आहेत.[६][७] मंचिर्याल हे शहर मंचिर्याल विधानसभा मतदारसंघात येते. जो पेद्दपल्ली लोकसभा मतदारसंघात मोडतो.
वाहतूक
संपादनमंचिर्याल येथे TSRTC (तेलंगणा राज्य मार्ग परिवहन महामंडळ)चे बसस्थानक आहे आणि सार्वजनिक वाहतूक सुविधा पुरवते.
शिक्षण
संपादनमहाविद्यालये
- शासकीय आयटीआय महाविद्यालय, मंचिर्याल
- शासकीय पदवी महाविद्यालय, मंचिर्याल
- शासकीय कनिष्ठ महाविद्यालय, मंचिर्याल
हे देखाल पहा
संपादनसंदर्भ
संपादन- ^ https://www.transport.telangana.gov.in/html/registration-districtcodes.html
- ^ Fürer-Haimendorf, Christoph von; Von, Furer-Haimendorf Christoph (1982-01-01). Tribes of India: The Struggle for Survival (इंग्रजी भाषेत). University of California Press. ISBN 978-0-520-04315-2.
- ^ "Mancherial Municipality". mancherialmunicipality.telangana.gov.in. 2022-01-20 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-02-08 रोजी पाहिले.
- ^ "Mancherial topographic map, elevation, relief". topographic-map.com (इंग्रजी भाषेत). 2022-02-08 रोजी पाहिले.
- ^ ":: Rainfall Integration::". www.tsdps.telangana.gov.in. 2022-02-08 रोजी पाहिले.
- ^ "Wayback Machine" (PDF). web.archive.org. 2016-06-15 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2022-02-08 रोजी पाहिले.
- ^ "Mancherial Municipality". mancherialmunicipality.telangana.gov.in. 2022-01-20 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-02-08 रोजी पाहिले.