मंगोल सैन्याची एकके
मंगोल सैन्याची बांधणी करताना चंगीझ खानापुढे अनेक टोळ्यांना एकत्र कसे बांधून ठेवावे हा प्रश्न होता. तो सोडवण्यासाठी त्याने सर्व टोळ्यांना एकत्रित करण्याचा निर्णय घेतला.
त्याने वेगवेगळ्या टोळ्यांतील १० सैनिकांचा एक गट केला ज्याला अरबान असे म्हणत. या दहा सैनिकांना त्यांची जात जमात विसरून कुटुंबाप्रमाणे एकत्र राहावे लागत असे. त्यातील वयाने मोठा सैनिक या दहांचा कुटुंबप्रमुखाप्रमाणे प्रमुख असे.
अशा १० अरबानांचा म्हणजेच १०० जणांचा एक झगुन बनत असे. या शंभरजणांपैकी एकजण झगुनचा प्रमुख म्हणून नियुक्त केला जात असे. १० झगुनांचा म्हणजेच १००० योद्ध्यांचा एक मिंगन तयार होई. १० मिंगनांच्या म्हणजेच १०,००० योद्ध्यांच्या गटाला तुमेन संबोधले जाई. तुमेनच्या प्रमुखाची निवड स्वतः चंगीझ करत असे.