मंगन जिल्हा
सिक्कीमधील जिल्हा
मंगन जिल्ह्याचे नकाशावरील स्थान
मंगन (जुने नाव: उत्तर सिक्कीम जिल्हा) हा भारताच्या सिक्कीम राज्यामधील आकाराने सर्वात मोठा जिल्हा आहे. हा जिल्हा सिक्कीम राज्याच्या उत्तर भागात स्थित असून ह्याच्या पश्चिमेस नेपाळ देश तर उत्तरेस चीनचा तिबेट प्रदेश आहेत. मंगन जिल्ह्याचे मुख्यालय मंगन येथेच आहे. केवळ ४३,००० लोकसंख्या असलेला हा जिल्हा भारतामधील सर्वात कमी लोकवस्ती असलेल्या जिल्ह्यांपैकी एक आहे. वेलदोडे उत्पादनामध्ये मंगन जिल्हा अग्रेसर आहे.
मंगन जिल्हा | |
सिक्कीम राज्यातील जिल्हा | |
सिक्कीम मधील स्थान | |
देश | भारत |
राज्य | सिक्कीम |
मुख्यालय | मंगन |
क्षेत्रफळ | |
- एकूण | ४,२२६ चौरस किमी (१,६३२ चौ. मैल) |
लोकसंख्या | |
-एकूण | ४३,७०६ (२०११) |
-लोकसंख्या घनता | १० प्रति चौरस किमी (२६ /चौ. मैल) |
-साक्षरता दर | ७८% |
प्रशासन | |
-लोकसभा मतदारसंघ | सिक्किम (लोकसभा मतदारसंघ) |
संकेतस्थळ |