गोरली

(भोरडया या पानावरून पुनर्निर्देशित)

गोरली, इंदोली, भोरडा किंवा रानचिरा (इंग्लिश:Indian Rosefinch; हिंदी:तुटी, तुती, लाल तुती, सुरखार टूटी) हा एक पक्षी आहे.

गोरली
Carpodacus erythrinus
Carpodacus erythrinus

याचा आकार चिमणीएवढा असतो. नराचे डोके, छाती, पाठ आणि खांदे गुलाबी असतात. मादीचा वर्ण मात्र तपकिरी असून, त्यावर ऑलिव्ह रंगाची छटा असते. चोच जाड त्रिकोणी असते. दुभागलेले शेपूट आणि पंखांवरील फिकट रंगांचे दोन पट्टे ही चिन्हे नर व मादींत ठळकपणे दिसून येतात.

भारतात जवळजवळ सर्वत्र तसेच पाकिस्तान, बांगला देश आणि ब्रह्मदेश येथील जंगले आणि शेतीचा प्रदेश या भागात आढळतात.

संदर्भ

संपादन
  • पक्षीकोश - मारुती चितमपल्ली