भोपळ्याची पुरी भोपळ्यापासून तार करण्यात येणारा खाद्यपदार्थ आहे.

साहित्य संपादन

लाल भोपळा, गुळ, तेल, गव्हाचे पीठ, कढई, खिसणी, प्रेसर कुकर, पाणी. ==कृती== – सर्वप्रथम भोपळा पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यावा, त्यानंतर त्याचे उभे काप करून घ्यावे. त्यानंतर भोपळ्या वरील साल काढून घ्यावी, त्या नंतर प्रेशर कुकर मध्ये अर्धा कप पाणी टाकावे व त्यात भोपळ्याचे काप टाकून कुकरच्या दोन शिट्या घ्यावा.

कुकर मधून भोपळ्याचे काप काढून ते थंड होऊ द्यावे. त्यानंतर त्यामध्ये गुळ व गव्हाचे पीठ मिक्स करावे, त्यात थोडे तेल टाकून मळून घ्यावे. पीठ मऊ झाल्यावर ते लाटून घ्यावी त्यानंतर कढई मध्ये तेल गरम करून लाटणी त्या मध्ये सोडावी व लाल होई पर्यंत तळावी, त्यानंतर ती एका पेपर वर काढून घ्यावी.