भू धातु संज्ञासूत्र
भूधातुरूपसिद्धौ आगतानां संज्ञासूत्राणां विश्लेषणम्।
१) लः परस्मैपदम्
लादेशाः परस्मैपदसंज्ञाः स्युः।
लकाराच्या स्थानी जे तिप्, तस्, झिइ. आदेश होतात ते परस्मैपद संज्ञक असतात.
२) तङानावात्मनेपदम्
तङप्रत्यहारः शानच्कानचौचैतत्संज्ञाः स्युः।
तङ् प्रत्यहार आणि शानच कानचप्रत्यय हे आत्मनेपद संज्ञक असतात.
३) तिङस्त्रीणि त्रिणि प्रथममध्यमोत्तमाः
तिङ् उभयोः पदयोस्त्रयस्त्रिकाःक्रमादेतत्संज्ञाः स्युः।
तिङ् प्रत्ययातील परस्मैपद व आत्मनेपद यांचे तीन तीन त्रिक - क्रमाने प्रथमपुरुष, मध्यमपुरुष, व उत्तमपुरुष संज्ञक असतात.
४) तान्येकवचनद्विवचनबहुवचनान्येकशः
लब्धप्रथमादिसंज्ञानि तिङस्त्रीणित्रीणि प्रत्येकमेकवचनादिसंज्ञानि स्युः।
प्रथमपुरुष वगैरे संज्ञा झाल्यानंतर जेत्रिकमध्ये तीन तीन आहेत, ते क्रमशः एकवचन, द्विवचन, व बहुवचन संज्ञक असतात.
५ तिङशित्सार्वधातुकम्
तिङ् शितश्च धात्वधिकारोक्ताएतत्संज्ञा स्युः।
धातूला लागणारे तिङ् आणि शित् प्रत्यय सार्वधातुकसंज्ञक असतात.
६) पूर्वाsभ्यासः
अत्र ये द्वे विहिते तयोः पूर्वाsभ्याससंज्ञःस्यात्।
सहाव्या अध्यायातील सूत्रांनुसार धातूला द्वित्व झाल्यावर दोन वेळा उच्चारित होणारा पूर्वरूप अभ्याससंज्ञक असतो.
७) लिट् च
लिडादेशस्तिङङार्धधातुकसंज्ञः।
लिट् लकारच्या स्थानावर आदेश झालेले तिङ् प्रत्यय आर्धधातुकसंज्ञक असतात.
८) आर्धधातुकं शेषः
तिङशिद्भयो अन्यो धातोरिती विहितः प्रत्यय एतत्संज्ञः स्यात्।
तिङ्, शित् प्रत्ययांव्यतिरिक्त जे प्रत्यय आहेत त्यांना आर्धधातुकसंज्ञक म्हणतात.
९) लिङाशिषि
आशिषि लिङस्तिङ् आर्धधातुकसंज्ञःस्यात्।
आशीर्वाद अर्थाने लिङ् लकाराच्याजागी जे तिङ् प्रत्यय येतात त्यांची आर्धधातुक संज्ञा होते.