Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
भुईमूगाची पाने व शेंगा
शेंगा-त्यातील एक उघडलेली आहे.त्यात भुईमूगाचे दाणे दिसतात.

एक तेलबी.

भुईमूग हे तेलवर्गीय महत्वाचे नगदी पीक आहे. पण काळाच्या ओघात त्याचे महत्त्व अन्नपीक म्हणून सुद्धा वाढीस लागले आहे. या पिकात निरनिराळ्या हवामानात जुळवून घेण्याची क्षमता आहे. तसेच हे पीक फेरपालटीस आणि आंतरपीक म्हणून घेण्यास अत्यंत उपयुक्त आहे. या पिकामुळे जमिनीची सुपीकता वाढते

भुईमूग लागवडसंपादन करा

रुंद वरंबे सरी या पद्धतीने भुईमूग लागवड करताना पूर्वमशागत करून रान भुसभुशीत झाल्यानंतर रुंद वरंबे व सरी तयार करण्यासाठी शेतात 150 सें.मी. अंतरावर खुणा करून, रेषा मारून आखणी करावी. पुन्हा रेषा मारलेल्या ठिकाणी 30 सें.मी. रुंदीचा पाट पाडल्यास 120 सें.मी. रुंदीचे व 15-20 सें.मी. उंचीचे गादी वाफे तयार होतील. हे वाफे प्रथम पाणी देऊन पूर्ण भिजवून वाफस्यावर आल्यावर त्यावर 30 सें.मी. रुंदीच्या चार ओळी बसवून अशा ओळींत दोन रोपांतील अंतर दहा सें.मी. ठेवून बियाण्याची टोकण करावी.