भास्करबाबा जामोदेकर (भानुकवी)

साचा:संदर्भ/जीवनपरिचय धर्मजागृती, ज्ञानगंगा, आत्मविकास भजन संग्रह भास्करबाबा जामोदेकरउर्फ भानुकवीहे महानुभाव पंथातील प्रमुख आचार्य,कीर्तनकार व समाजप्रबोधन करणारे शाहीर होते.

पार्श्वभूमी

संपादन
  • नाव-आचार्य भास्करबाबा जामोदेेकर (भानुकवी)
  • जन्म-गोदमगाव ता. बिलोली, जिल्हा - नांदेड
  • पंथीय शिक्षण-बोरी जि. परभणी येथे आचार्य श्री शेवलीकर मोठेबाबा(कल्लूरकर) यांच्या सन्निधानात पंथीय शिक्षण पूर्ण झाले.
  • वडिलांचे नाव-राजरामराव उमाटे
  • आईचे नाव-हिराबाई उमाटे
  • टोपणनाव-भानुकवी
  • जन्म- ७ जुलै १९२३
  • मृत्यू- ५ जुलै २००७
  • संप्रदाय-महानुभाव
  • कार्यक्षेत्र- ब्राम्हविद्या अभ्यासक, साहित्यिक, कवी, शाहीर, समाजप्रबोधनकार,कीर्तनकार
  • पुरस्कार- कविरत्न ही उपाधी प्रदान सोनखास हेटी(यवतमाळ) येथे दृष्टातंस्थळ प्रवचन सोहळ्यात आचार्य श्री वर्धनस्थ बीडकर बाबा यांच्या हस्ते प्रदान.आचार्य श्री शेवलीकर बाबा यांनी भानुकवी ही उपाधी दिली.

बालपण व शिक्षण

संपादन

आचार्य भानुकवी यांचा जन्म ८ जुलै १९२३ रोजी  क्षत्रिय वंशात माता सौ.हिराबाई व पिता श्री राजरामराव उमाटे यांच्या पवित्र उदरी मु. गोदमगाव ता.बिलोली जि. नांदेड येथे झाला.  भानुकवी हे सहा महिन्यांचे असताना त्यांच्या आईने कॉंलरा  रोगामुळेे आपले पार्थिव शरीर सोडले. नंतर  पालन पोषणाची जबाबदारी वडिलांकडे आली होती. दुःखी झालेल्या वडिलांनी आपण  बालकासह आपले जीवन संपवून टाकावे म्हणून नदीकाठी आले. पण म्हणतातना देव तारी त्याला कोण मारी अगदी त्याच वेळी महानुभाव धर्माचे एक भिक्षुक प.पु.दत्तराज दादा जमोदेकर हे भिक्षा मागण्याच्या हेतूने त्या गावात आले होते. त्यांनी हा प्रसंग पहिला आणि त्या बालकाच्या वडिलांना हे पाप करण्यापासून परावृत्त केले. काही योग्य व्यक्तींच्या संमतीने हे बालक महानूभावांना  द्यावे असा निर्णय सांगितला. पुढे या बालकाचे संगोपन व सांभाळ माता गंगाबाई यांनी केले. वजीरगावच्या मठात यांचे बालपण गेले. काही दिवस त्यांचे वजीरगाव जि. नांदेड या गावी महानुभावीय मठात अध्ययन झाले. वयाच्या २० व्या वर्षी महानुभाव तत्त्वज्ञानाला अनुसरून त्यांनी श्री.म. गोविंदराज जमोदेकर यांना निमित्त करून संन्यास दीक्षा घेतली.

पुढे ते जालना निवासी आचार्य श्री.शेवलीकर बाबा यांच्या सन्निधानात आले. शेवलीकर बाबांचा मार्ग हा फिरस्ती मार्ग होता त्यामुळे तेथे अटन , विजन, भिक्षा भोजन आदी नित्यविधीचे धर्माचरण होऊ लागले होते.हे बाबा मुळात कवी होते. त्यांची "हे श्री भगवन भवान परब्रह्म ही संस्कृत रचना पंथात प्रसिद्ध होती. मोठ्या बाबांचा हा काव्यगुण भास्कर दादांनी उचलला होता.

भास्करदादांना लहानपणापासून कविता आणि भजनाचा छंद होता. त्यांनी वयाच्या विसाव्या वर्षी अनेक भजने रचली . याशिवाय संप्रदायात कीर्तन आणि  शाहिरी काव्याचा त्यांनी आरंभ केला. याच कार्याची दखल घेऊन सोनखास हेटी येथे आचार्य वर्धनस्थ बिडकर बाबा यांनी दृष्टांत स्थळ प्रवचनात भास्करदादांना 'कविरत्न' ही उपाधी देऊन त्यांचा गौरव केला. आणि पुढे ते भास्करदादांचे भानुकवी जामोदेकर म्हणून संपूर्ण पंथात प्रसिद्धी पावले.

परभणी जिल्ह्यातील बोरी येथे शेवलीकर बाबा (कल्लूरकर) यांच्या सहवासात कविवर्यानी काही दिवस अध्ययन केले. बोरी येथे १९८३ साली महावाक्य प्रवचन सोहळा आयोजित केला गेला. या प्रवचन सोहळ्यात अनेक ब्रह्मविद्या अभ्यासक होते. त्यापैकी कविवर्य हे एक होत. कविवर्याची तल्लख  काव्यप्रतिभा आणि ब्रम्हविद्या अभ्यास पाहून मोठे बाबा त्यांच्यावर फार खुश झाले. मोठ्या बाबांची ही प्रेरणा त्यांच्यासाठी एक वरदान ठरले.

बदनापूर हे जालना औरंगाबाद मार्गावरील एक महत्त्वाचे गाव होते. बोरीहुन  शेवलीकर बाबांचा आश्रम बदनापूर येथे जाणार असल्याचे पु.कृष्णराज बाबा यांनी ससंगीतले आणि हा आश्रम बोरी वरून बदनापूरला आला. मराठवाड्यातील हे मध्यवर्ती ठिकाण सर्वांसाठी येण्याजाण्याच्या दृष्टिकोनातून व्यवस्थित होते. या आश्रमात बाबांच्या काव्याला खरी चालना मिळाली. या मार्गात भानुकवी आणि दामोदर कवी हे दोनच कविवर्य होते. आणि तेही एकमेकास परस्परपूरक असे होते.या दोन कविवर्यानी बदनापूर येथील भूमीला एक वेगळे वळण दिले होते. येथूनच त्यांच्या काव्याची महाराष्ट्रभर ख्याती प्राप्ती झाली.

सामाजिक व साहित्यिक योगदान

संपादन

भानुकवी यांच्या काव्यात राष्ट्रप्रेम,बंधुभाव,चरित्र्यनिर्मित,समाजसेवकत्व,ज्ञान,भक्ती, वैराग्य आदी काव्यगुण ओतप्रोत भरले होते. तत्कालीन समाजात व्यवस्थेत  क्रांती होऊन  नवीन समाज निर्मिती व्हावी. अशी काही काव्यसंपदा त्यांनी निर्माण केली. शालेय जीवनात उच्च शिक्षणाची फारशी संधी मिळाली नसली तरीही त्यांनी कवित्वाचा व्यासंग वाढविला होता.कवींची कविता ही शांत,भावपूर्ण आणि मोकळ्या शैलीत असल्याने ही कविता सर्वांना प्रिय झाली. महावाक्य वर्णन, त्रयी मालिकाख्यान, दृष्टांत आख्यान, जीवनधारा हे स्फुटलेखन आणि दिनाची हाक, धर्मजागृती,ज्ञानगंगा, आत्मविकास,अनमोल,पंचकृष्ण इत्यादी काव्यसंपदा त्यांची प्रसिद्ध आहे.

सन १९९५ मध्ये आचार्य भानुकवी  यांनी अंबड जि. जालना याठिकाणी पंचकृष्ण ज्ञानाश्रमाची स्थापना केली. या कामी त्यांना मदत करण्यात पु.प्रभाकरशास्त्री आणि पु.श्री.दिगंबर दादा यांचा सिंहाचा वाटा होता.आश्रम स्थापन झाल्यावर काही काळातच पु.प्रभाकरशास्त्री यांचे अल्पावधीतच निधन झाले. शास्त्री संगीत शास्त्राचे उत्तम जाणकार होते. संगीत विशारद ही पदवी त्यांनी देहरादून येथून प्राप्त केली होती. कविवाऱ्याची अनेक काव्य त्यांनी संगीतबद्ध केली आहेत. पुढे पु.श्री.दिगंबर दादा यांनी कविवर्यांची आयुष्यभर  एकनिष्टपणे सेवा केली. त्याच बरोबर शाहिरी परंपरेत रुस्तुम शाहीर, दामोदर शाहीर या महानुभाविय शाहिरांचेही ते प्रेरणास्त्रोत होते.

कीर्तन क्षेत्र

संपादन

कीर्तन या  वाङ्मय प्रकाराला महानुभाव संप्रदायामध्ये सहसा कुणी हात घालत नाही. महानुभाव संप्रदायात कीर्तनाची सर्वप्रथम सुरुवात बाबांनी केली. ही कीर्तन परंपरा  त्यांनी गाडगेबाबा, तुकडोजी महाराज यांच्या किर्तनपरंपरेशी नाळ जुळवणारी ठरली. स्वतः  ते उत्तम प्रकारचे खंजिरीवादक होते.  नवतरुणांनाचे किर्तनाद्वारे आणि  प्रबोधन केले.व्यसनमुक्ती,नसबंदी,बालविवाह या सामाजिक अनिष्ट रूढीविरुद्ध समाजाला किर्तनोपदेश केला. या कीर्तनात स्वतः ते संत तुकाराम , तुकडोजी महाराज यांच्या अभंगाचा समावेश कीर्तनात करत असत.  वैरीयाचा  देव झाला म्हणुनी काय दगडे हाणूनी फोडवा' दुसऱ्या संप्रदायाचा बाबा तेवढ्याच पद्धतीने परामर्श घेतात. जे जे चांगले आहे ते ते उदार अंतःकरणाने घ्यावे असे त्यांचे मत होते. या  आधी संप्रदायात  खंजिरी कुणीही हातात घेतली नव्हती पण  बाबांनी याची सुरुवात केली आणि नवकिर्तनकारांना मार्गदर्शक ठरले. 

सोडी सोडी मनाची आशा , देहाचा नाही भरवसा 

ही किर्तनातील चाल त्यांनी अस्तित्वात आणली.पुढे बऱ्याच कीर्तनकारांनी याच अभंगावर कीर्तन करणे चालू  केले होते. खुद्द बा.भो.शास्त्री यांनी सावदा येथे आपले पहिले कीर्तन याच अभंगावर केले. असा उल्लेख मार्गस्थ या आत्मचरित्रात आढळतो.

स्वातंत्र्यसंग्रामातील दिशादर्शक पोवाडे

संपादन

 पोवाडा हे विररस प्रधान असणारे हे काव्य आहे. पण बाबांनी त्यामध्ये "धिरविरा होव्हावें" या सूत्रानुसार संत आणि महंतांच्या जीवनकार्यावर पोवाडे लिहिले आणि या काव्याला एक वेगळे रूप देण्याचा प्रयत्न केला.याच बरोबर समाजहित लक्षात घेऊन स्वातंत्र्यसंग्रामात लढणाऱ्या तरुणांना दिशा देणारी काव्य निर्मिती केली. स्वातंत्र्याचा पोवाडा, रझाकरचा पोवाडा, गीतेचा पोवाडा , आणीबाणी या सामाजिक स्वातंत्र्य चळवळीतील काव्याची उभारणी  केली. 

भक्तीकाव्याची हातोटी

संपादन

बाबांच्या पाचही काव्यग्रंथात भक्ती काव्याचा सुगंध चोहीकडे दरवळतो आहे. रसाळ भाषा, भक्तीकाव्याचा ओलावा, ईश्वर स्तुती आदी त्यांच्या लेखनाची वैशिष्ट्ये सांगता येतील. एक बडा अचंबा पाया मुरदे ने मूरदा खाया ? या प्रश्नाने तर त्या काळी संपूर्ण  महाराष्ट्राला वेड लावले होते.

संसार सोडून परमेश्वराच्या दरबारात आलेल्या भक्ताचे वर्णन करताना कवी आपल्या काव्यात म्हणतात.

आलो देवा तुझ्या मी दरबारी रे ।

तुझा होउनी मी भिकारी।।

तुझ्या पायी सोडीला संसार । 

घरदार हा माया बाजार ।।

दिली सोडुनी लाज लज्जा सारी रे। 

तुझा होउनीया भिकारी ।।

महानुभवांचे चौथे अवतार भगवान गोविंदप्रभुवर कवींनी एक काव्य केले आहे.

गोविंद प्रभू माझा कैवल्याचा राजा । 

शतकोटी त्याशी नमस्कार माझा ।।

अस म्हणून ईश्वराला ते वंदन करतात. 

महानुभावांचे जालना जिल्ह्यातील महत्त्वाचे तर्थक्षेत्राचे  ठिकान "जाळीचा देव" येथील  लिळेवर त्यांनी काव्यबंधानी केली आहे.

चला जाळीच्या देवाला जाऊ। तेथे जीवांचा जिवलग पाहू श्रीचक्रधर भगवंत ।जाळीच्या आले घाटात ।

जाळीच्या आले घाटात । भक्तांना दर्शन देऊ ।।

असा भक्तीचा सुगंध त्यांच्या काव्यात नेहमी दिसून येतो. हे काव्य भक्तिरसात रमलेल्या भक्ताला ईश्वराची भेट घडवत असत 

४ कलगी तुरा

 कलगी तुरा हा प्रश्नोत्तररूपी संवाद त्याकाळी खुप चालायचा.यामध्येही भानुकवींनी आपली छाप उमटवली होती.नांदेड, परभणी,औरंगाबाद आदी ठिकाणी त्यांचे कालागींतुऱ्याचे कार्यक्रम झाल्याची नोंद आढळते.सर्व ठिकाणी त्यांना विजयी पत्र त्यांनी मिळविले होते.

५ प्रशोंत्तरीअसावा नसावा कार्यक्रम

     हा कार्यक्रम म्हणजे त्याकाळच्या कवी लोकांची एक कसोटीच होती. अनेक पदे त्यांचे असावा नसावा या काव्यप्रकारावर आधारित आहे.अनंत फंदीचा फटका काव्य प्रकारासारखे बरेच अप्रकाशित साहित्य आज बाबांचे आहेत. ते लवकरच प्रकाशित होईल अशी अपेक्षा आहे. 

६ राष्ट्रसंताची अपूर्व भेट

   राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मुंबईच्या तुरुंगात असताना बाबाजी त्यांना भेटायला गेले. सदोदित श्रीकृष्णाची परमसेवा करणारे हे महामानव होते. अधून मधून त्यांचा नेहमी पत्र व्यवहार व्हायचा. ते मोठ्या सहृद्यतेने राष्ट्रसंताची चौकशी करायचे.नंतरच्या काळात आणिबाणी लागली होती त्यावरही कवींनी एका दीर्घ काव्याची रचना केली आहे.

अशा या बहुआयामी कीर्तनकार,शाहीर,साहित्यिक, समाजप्रबोधनकार अशा विविध पदांनी कविवर्याचे व्यक्तिमत्त्व खुलून दिसते.