ज्ञानेश्वरी

भगवद्गीतेवर ज्ञानेश्वरांनी केलेले भाष्य
(भावार्थदीपिका या पानावरून पुनर्निर्देशित)

शा.श. १२१२, अर्थात इ.स. १२९०, साली प्रवरातीरी असणाऱ्या नेवासे या गावातील मंदिरात एक खांबाला टेकून भगवद्गीतेवर ज्ञानेश्वरांनी जे भाष्य केले त्यालाच ज्ञानेश्वरी किंवा भावार्थदीपिका म्हणले जाते. ज्ञानेश्वरीत एकूण १८ अध्याय आहेत.

ज्ञानेश्वरीतील दोन पानं

सर्वसामान्यांसाठी असणारा गीतेवरील ज्ञानेश्वरांचा हा मराठीतील सर्वश्रेष्ठ ग्रंथ आहे. मराठीतील गोडवा अन्य भाषिकांना कळावा या उद्देशाने संस्कृत(गीर्वाण), हिंदी भाषा, कन्नड, तमिळ, इंग्रजीबरोबरच २१ निरनिराळ्या भाषांमध्ये ज्ञानेश्वरी भाषांतरित झाली असून ते भाषांतरित छापील ग्रंथ उपलब्ध आहेत.

  • 'ज्ञानेश्वरी' लिहून घेणारे लेखक - सच्चिदानंद बाबा
  • 'ज्ञानेश्वरी'चे पहिले भाष्यकार - संत निवृत्तीनाथ महाराज.
  • 'ज्ञानेश्वरी'चे पहिले संशोधक - संत एकनाथ.
  • 'ज्ञानेश्वरी'चा पहिला संकलनकार - संत महिपती.
  • 'ज्ञानेश्वरी'चे पहिले प्रसारक - संत नामदेव.
अध्याय श्लोक ओवी
अध्याय १ अर्जुनविषादयोग ४७ २७५
अध्याय २ सांख्ययोग ७२ ३७५
अध्याय ३ कर्मयोग ४३ २७६
अध्याय ४ ज्ञांनासान्यासयोग ४२ २२५
अध्याय ५ योगगर्भयोग २९ १८०
अध्याय ६ आत्मसंयमयोग ४७ ४९७
अध्याय ७ विज्ञानयोग ३० २९०
अध्याय ८ ब्रह्माक्षरनिर्देशयोग २८ २७१
अध्याय ९ राजविद्याराजगुह्यायोग ३४ ५३५
अध्याय १० विभूतियोगा ४२ ३३५
अध्याय ११ विश्वरूपदर्शनयोग ५५ ७०८
अध्याय १२ भक्तियोग २० २४७
अध्याय १३ प्रकृतीपुरुषविवेकयोग ३४ ११६९
अध्याय १४ गुणातीतयोग २७ ४१५
अध्याय १५ पुरुषोत्तमयोग २० ५९८
अध्याय १६ दैवसुरसंपद्विभागयोग २४ ४७३
अध्याय १७ श्रद्धादिंनिरुपणयोग २८ ४३३
अध्याय १८ सर्वगीतार्थसंग्रहयोग ७८ १८१०
एकूण ७०० ९११२

संशोधित प्रती

संपादन

संत एकनाथ महाराज हे ज्ञानेश्वरीचे आद्य सम्पादक असून आज जी ज्ञानेश्वरी आपण वाचतो ती एकनाथांनी शुद्ध केलेली प्रत आहे. एकनाथांनी ज्ञानेश्वरीच्या तत्कालीन शेकडो प्रति जमा करून शुद्ध प्रति तयार केल्या व आधीच्या ज्यांच्याकडून घेतल्या त्यांना पुन्हा शुद्ध प्रति प्रदान केल्या. संत एकनाथ महाराज हे मराठी भाषेचे आद्य संपादक ठरतात.

ज्ञानेश्वरीच्या जुन्याजुन्या प्रती शोधून काढून त्यांच्यावर अनेकांनी संशोधन केले. गणेश बापूजीशास्त्री मालवणकर, रा.श्री. गोंधळेकर, जांभेकर, देवस्थळी, ना.रा. सोहोनी, हर्षे, बनहट्टी, प्रियोळकर, मंगरूळकर, रामदास डांगे, पां.ना. कुलकर्णी ही त्यांतील संशोधकांची काही नावे. अशा विद्वानांच्या संशोधक वृत्तीतून ज्ञानेश्वरीच्या सुधारित प्रती तयार झाल्या. त्यांतील काही प्रती या -

  • कुंटे प्रत (अण्णा मोरेश्वर कुंटे यांची ’बरवा’ पद्धतीची प्रत) : ही प्रत इ.स. १८९४ ते १९४५पर्यंत निर्णयसागर प्रकाशनाकडून, आणि नंतर पाठक आणि इतर प्रकाशकांकडून (उदा० वामनराज प्रकाशन संस्था) प्रसिद्ध होत राहिली आहे.
  • विष्णूबुवा जोग महाराज प्रत
  • सोनोपंत दांडेकर प्रत
  • गोविंद बर्वे प्रत (गोविंद बर्वे यांनी इ.स. १६९१मध्ये ज्ञानेश्वरीला भावार्थदीपिका या नावाने संबोधिले.त्यापूर्वी, इ.स. १६७८मध्ये वामनपंडितांनी स्वतः लिहिलेल्या भगवद्‌गीतेवरील टीकाग्रंथाला यथार्थदीपिका हे नाव दिले होते.).
  • भिडे प्रत
  • माडगांवकर प्रत
  • राजवाडे प्रत
  • साखरे महाराज प्रत

राजवाडे प्रत

संपादन

विश्वनाथ काशिनाथ राजवाडे ह्यांनी ज्ञानेश्वरीची जुनी प्रत शोधून तिचे व्याकरण सिद्ध केले. 'ज्ञानेश्वरीचे व्याकरण उलगडून दाखवताना राजवाड्यांनी मराठीचा इतिहास पण सांगितला आहे . बरवे प्रत, माडगावकर प्रत, पारंपरिक प्रत अशा ज्ञानेश्वरीच्या इतरही काही प्रती आहेत. राजवाड्यांनी वापरलेली प्रत बालबोध लिपीत आहे. ही एकनाथपूर्व प्रत असावी.

परकीय आक्रमणांपासून मुक्त महाराष्ट्रातला हा ग्रंथ जुन्या शुद्ध मराठीची वळणे दाखवतो.

ज्ञानेश्वरीचे निरूपण करणारे अनेक ग्रंथ आहेत, त्यांपैकी काही हे

संपादन
  • अध्यात्म ज्ञानेश्वरी (शुभदा खाडिलकर)
  • अध्यात्माचा शास्त्रीय अन्वयार्थ अर्थात ज्ञानेश्वरीचे सुलभ संकलन (धनश्री कानिटकर)
  • (श्रीमंत्र) अभंग ज्ञानेश्वरी, भाग १, २ (स्वामी स्वरूपानंद)
  • अमृतमधुर संपूर्ण ज्ञानेश्वरी ( ज्ञानेश्वर तांदळे)
  • अमृत ज्ञानेश्वरी, भाग १ ते ६ (राम केशव रानडे)
  • असावी घरोघरी आरोग्य ज्ञानेश्वरी
  • आरोग्य ज्ञानेश्वरी
  • आर्याबद्ध ज्ञानेश्वरी (मोरेश्वर तासकर)
  • इये भक्तीचिये वाटे लाग : ज्ञानेश्वरी अध्याय ९ (कृष्णानाथ वैद्य)
  • ॐ नमो ज्ञानेश्वरी (कृष्णकांत नाईक)
  • ओळखीचे सूर : ज्ञानेश्वरी भाग १ (फु.ल. वनवासी फुल, रा.अ. काळेले, श्री.मा. कुलकर्णी, ना. टिळक).
  • The Genius of Dnyaneshwar (डेमी-साईज पृष्ठसंख्या १०३४, लेखक - रवीन थत्ते)
  • ’अमृतकण’ ज्ञानेश्वरी (रमेश लिमये)
  • अमृतमय श्री ज्ञानेश्वरी (आबा परांजपे)
  • केतकी-शब्दार्थ जान्हवी सहित ज्ञानेश्वरी खंड-अनेक (द.वे. केतकर)
  • गीत ज्ञानेश्वरी (प्रल्हाद अवचट)
  • गीता ज्ञानेश्वरी नवनीत (रा.ना. चौधरी)
  • गीर्वाण ज्ञानेश्वरी (अ.वि. खासनीस)
  • ग्रंथश्रेष्ठ ज्ञानेश्वरी (नि.ना. रेळेकर)
  • घरोघरी ज्ञानेश्वरी जन्मती (ह.वि. सरदेसाई)
  • जाणीव, भाग १, २ (ज्ञानेश्वरीतील काही ओव्यांवर लिहिलेले हे मुक्त निबंध आहेत. एकूण १३४ ओव्यांवर यामध्ये भाष्य केलेले आहे) (लेखक - रवीन थत्ते)
  • दर्शन ज्ञानेश्वरी (वि.ग. कानिटकर)
  • दिव्यामृतधारा : श्री ज्ञानेश्वरीच्या बाराव्या अध्यायावरील प्रगत दर्शन (मोरेश्र्वर)
  • दैनंदिन ज्ञानेश्वरी (प्र न जोशी)
  • नमो ज्ञानेश्वरी (अक्षय प्रकाशन)
  • नवनीत-ज्ञानेश्वरी (गजानन कृष्णाजी सावरकर)
  • निवडक ज्ञानेश्वरी (रमेश पुंडलिक)
  • निवडक ज्ञानेश्वरी (वामन देशपांडे)
  • पुरुषोत्तम मंगेश लाड स्मृति व्याख्यानमाला : ज्ञानेश्वरी साहित्याचे अक्षर लेणे (सरकारी मुद्रणालय, नागपूर)
  • प्रसाद ज्ञानेश्वरी (अविनाश साठे)
  • बाल-बोध ज्ञानेश्वरी (गोपीनाथ तळवलकर)
  • बीज ज्ञानेश्वरी (माधव कानिटकर)
  • भागवत महापुराण आणि ज्ञानेश्वरी (रा.श. नगरकर)
  • भारतीय संस्कती कोश (खंड १० सिंधी लोक ते ज्ञानेश्वरी) (संपादक : महादेवशास्त्री जोशी)
  • भाव गीतांजली अर्थात गीत ज्ञानेश्वरी (घोडवैद्य)
  • भावे अवलोकिता ज्ञानेश्वरी (सु़षमा वाटवे)
  • महाराष्ट्र साहित्य पत्रिका (ज्ञानेश्वरी विशेषांक) एप्रिल ते सप्टेंबर १९७५ (भालचंद्र फडके)
  • माणूस नावाचे जगणे (ज्ञानेश्वरीतील ओव्यांच्या आधारे केलेले 'माणुसकी'बद्दलचे विवेचन) (लेखक - रवीन थत्ते)
  • मी हिंदू झालो (वैचारिक) (लेखक - रवीन थत्ते)
  • मुलांसाठी ज्ञानेश्वरी (शैलजा मुकुंद सबनीस)
  • येई परतुनी ज्ञानेश्वरा (लेखक - डॉ. रामचंद्र मोरवंचीकर)
  • रत्नजडित ज्ञानेश्वरी (प्र.न. जोशी)
  • लोकराज्य श्री ज्ञानेश्वरी सप्तशताब्दी (महाराष्ट्र शासन शिक्षण विभाग)
  • वाचावी ज्ञानेश्वरी (शिरीष कवडे)
  • (वि)ज्ञानेश्वरी (तत्त्वज्ञानविषयक, लेखक - रवीन थत्ते, सहलेखिका - मृणालिनी चितळे)
  • व्यक्तिमत्त्व विकासाची आधुनिक ज्ञानेश्वरी भाग-१, २ (जयप्रकाश बागडे)
  • शारदीचिये चंद्रकळे (रामचंद्र देखणे)
  • शिकवण ज्ञानेश्वरीची (शरदचंद्र कोपर्डेकर)
  • ज्ञानदेवीची गौरवगाथा (स.कृ. देवधर)
  • सचित्र श्री ज्ञानेश्वरी कथासार (दत्तराज देशपांडे)
  • सचित्र सटीप ज्ञानेश्वरी (संपादक, गणेशशास्त्री जोशी)
  • सचित्र सार्थ ज्ञानेश्वरी सार : नित्य बोधपाठावली (एस.के. गायकवाड)
  • सटीप ज्ञानेश्वरी (काका जोशी)
  • सटीप ज्ञानेश्वरी, अमृतानुभव व चांगदेवपासष्टीसह (कृ.वि. सोमण, का.रा. पाटील)
  • सटीप श्री ज्ञानेश्वरी (दिवाकर अनंत घैसास)
  • सटीप ज्ञानेश्वरी (रा.गो. पाटील)
  • संपूर्ण सुलभ ज्ञानेश्वरी (काशीनाथ अनंत जोशी)
  • संपूर्ण सुलभ ज्ञानेश्वरी (मराठी साहित्य प्रकाशन)
  • समओवी ज्ञानेश्वरी (अंजली ठकार)
  • सर्वांसाठी ज्ञानेश्वरी (शशिकांत नानल)
  • संक्षित ज्ञानेश्वरी (मुकुंद गोखले)
  • सांगते ऐका ज्ञानेश्वरी (शंकराव निकम)
  • सार्थमोदिनी ज्ञानेश्वरी (धुंडीराज ना.ऋणीपाठक)
  • सार ज्ञानेश्वरी (विठ्ठल स. काटकर, शारदा प्रकाशन)
  • सार्थ श्री ज्ञानेश्वरी (गो.नी. दांडेकर)
  • सार्थ श्री ज्ञानेश्वरी (ढवळे प्रकाशन)
  • सार्थ श्री ज्ञानेश्वरी (तु.रा. यादव, रंगनाथ परभणीकर)
  • सार्थ ज्ञानेश्वरी (प्रकाशक : (नानामहाराज जोशी)
  • सार्थ श्री ज्ञानेश्वरी (बाळकृष्ण अ. भिडे)
  • सार्थ श्री ज्ञानेश्वरी (म.शं. गोडबोले)
  • सार्थ ज्ञानेश्वरी (वारकरी शिक्षण संस्था प्रकाशन, आळंदी)
  • सार्थ ज्ञानेश्वरी (विद्या प्रकाशन)
  • सार्थ ज्ञानेश्वरी (विनायक ना. जोशी)
  • सार्थ ज्ञानेश्वरी (शं.वा. दांडेकर)
  • सार्थ श्री ज्ञानेश्वरी रहस्य (श्रीकांत देसाई)
  • सार्थ ज्ञानेश्वरी प्रस्तावना (सोनोपंत दांडेकर)
  • साहित्य-ज्ञानेश्वरी विशेषांक (हेमंत इनामदार. प्रकाशक : मुंबई मराठी साहित्य संघ)
  • सिद्ध ज्ञानेश्वरी अध्याय (सर्वेश्वरी)
  • सुबोध ज्ञानेश्वरी (श्रीधर भास्कर वर्णेकर)
  • सुबोध ज्ञानेश्वरी अध्याय १ ते १८ (प्रकाशक : यशवंत गोपाळ जोशी)
  • सुबोध ज्ञानेश्वरी अध्याय १४ ते १८ (य.गो. जोशी)
  • सुरूप ज्ञानेश्वरी (प.रा. ओक)
  • स्वरूप ज्ञानेश्वरी (प्र.ग. देशमुख)
  • स्वरूप ज्ञानेश्वरी (म.ना. झोळ)
  • स्वरूप ज्ञानेश्वरी (रा.वि. गोडबोले)
  • स्वाध्याय ज्ञानेश्वरी खंड १ ते ४अ (आबा परांजपे)
  • ज्ञानेश्वर आणि ज्ञानेश्वरी (न.र. फाटक)
  • ज्ञानेश्वरी (अण्णा मोरेश्वर कुंटे)
  • ज्ञानेश्वरी (अ.दा. आठवले).
  • श्री ज्ञानेश्वरी (अबक)
  • श्री ज्ञानेश्वरी (अशोक कामत)
  • ज्ञानेश्वरी (कृ.वि. सोमण)
  • ज्ञानेश्वरी (गोविंद रा. मोघे)
  • श्री ज्ञानेश्वरी (द.वा. पाठक)
  • ज्ञानेश्वरी (बा.मा.खुपेरकर, रेळेकर)
  • ज्ञानेश्वरी (भालचंद्र खांडेकर, लीला गोविलकर)
  • श्री ज्ञानेश्वरी (महादेवशास्त्री जोशी
  • श्री ज्ञानेश्वरी (महाराष्ट्र शासन शिक्षण विभाग)
  • श्री ज्ञानेश्वरी.(प्रकाशक : महाराष्ट्र सरकार)
  • श्री ज्ञानेश्वरी (वि. का. राजवाडे)
  • ज्ञानेश्वरी (वैकुंठराय)
  • ज्ञानेश्वरी (व्यं.त्र्यं. चाफेकर)
  • ज्ञानेश्वरी (श्री.मा. कुलकर्णी)
  • श्री ज्ञानेश्वरी (सत्यदेवानंद सरस्वती)
  • ज्ञानेश्वरी अध्याय १ (ग.स. शुक्ल)
  • ज्ञानेश्वरी अध्याय १ (निर्मलकुमार फडकुले)
  • ज्ञानेश्वरी अध्याय १ (वा.पु. गिंडे, सूर्यकांत खांडेकर)
  • ज्ञानेश्वरी : अध्याय पहिला (रत्नाकर बापुराव मंचरकर)
  • ज्ञानेश्वरी २रा अध्याय (बा.मा.खुपेरकर)
  • ज्ञानेश्वरी (अध्याय ३ रा, ५वा, मंगळूरकर)
  • ज्ञानेश्वरी अध्याय ३, १२ (अरविंद मंगरुळकर, विनायक मो. केळकर)
  • ज्ञानेश्वरी अध्याय तिसरा (हेमलता नाईक)
  • श्री ज्ञानेश्वरी भाग ३ (रामचंद्र वाळिंबे)
  • श्री ज्ञानेश्वरी अध्याय - ४था (स.रा.गाडगीळ)
  • ज्ञानेश्वरी अध्याय ५ (रामदास डांगे)
  • ज्ञानेश्वरी (अध्याय ७) (संपादित, वि. य. कुलकर्णी)
  • ज्ञानेश्वरी (अध्याय ७) (श्रीनिवास ना. बनहट्टी)
  • ज्ञानेश्वरी अध्याय ९वा (अ.ना. देशपांडे)
  • ज्ञानेश्वरी नववा अध्याय (पा.ना. कुलकर्णी)
  • ज्ञानेश्वरी अध्याय ९वा (वि.का. राजवाडे)
  • ज्ञानेश्वरी अध्याय ९ ते १२ (बाबूरावबुवा चतुर्भुज)
  • श्री ज्ञानेश्वरी (अध्याय ९वा, १६वा) (ल.वि. कर्वे)
  • ज्ञानेश्वरी अध्याय बारावा (डाॅ. मदन कुलकर्णी)
  • ज्ञानेश्वरी १२वा अध्याय. (संपादित, कल्याण काळे/दत्तात्रेय पुंडे)
  • ज्ञानेश्वरी (अध्याय १२वा), (शं.वा. दांडेकर)
  • ज्ञानेश्वरी १२वा अध्याय (स.रा. गाडगीळ)
  • ज्ञानेश्वरी अध्याय -१२वा (राहेगांवकर, वाडीकर)
  • ज्ञानेश्वरी अध्याय १२वा, १६वा (महादेव नामदेव अदवंत)
  • ज्ञानेश्वरी अध्याय १६ (प्रा. डॉ. बी.एन. पाटील, प्रा. डॉ. आशालता महाजन)
  • ज्ञानेश्वरी अध्याय १७ (दत्तात्रेय सीताराम पंगू)
  • ज्ञानेश्वरी १७ अध्याय (भालचंद्र खांडेकर)
  • श्री ज्ञानेश्वरी खंड १ ते ४ (देशपांडे)
  • ज्ञानेश्वरी भाग १, २. (लेखक - रवीन थत्ते)
  • श्री ज्ञानेश्वरी भाग १ ते ४ (रामचंद्र वाळिंबे)
  • श्री ज्ञानेश्वरी भाग १, २, ३ (रिसबुड कर्वे)
  • ज्ञानेश्वरी अंतरंग (१९४८ पृ़ष्ठसंख्या ११७)
  • श्री ज्ञानेश्वरी आणि संत मंडळ (हे.वि. इनामदार)
  • ज्ञानेश्वरी : एक अपूर्व शांतिकथा (व.दि. कुलकर्णी)
  • ज्ञानेश्वरी आत्मानंदाचे तत्त्वज्ञान (ग़जानन विष्णू तुळपुळे)
  • ज्ञानेश्वरी एक शोध (उषा देशमुख)
  • ज्ञानेश्वरी-ऐश्वर्य भाग पहिला, मंगलदालन (दार्शनिक)
  • ज्ञानेश्वरी (ओबडधोबड) भाग १, २. (लेखक - रवीन थत्ते)
  • ज्ञानेश्वरी कथामृत खंड १, २, (शं.दि. करंदीकर)
  • ज्ञानेश्वरी कथासार (नारायण गं. ओक)
  • श्री ज्ञानेश्वरी- कळसाध्याय (अनेक भाग)
  • ज्ञानेश्वरी काव्यपंथ {वसंत दावतर)
  • श्री ज्ञानेश्वरी गूढार्थ दीपिका (अनेक खंड, बाबाजी महाराज पंडित)
  • श्री ज्ञानेश्वरी गूढार्थ दीपिका (अनेक खंड, नाथ पै. पंडित)
  • ज्ञानेश्वरी ग्रंथ माहात्म्य (रमेश पुंडलिक)
  • ज्ञानेश्वरीचा काव्यबंध (म.सु. पाटील)
  • ज्ञानेश्वरीचा तृष्णाबंध (म.सु. पाटील)
  • ज्ञानेश्वरीचे अंतरंग (ग्रंथपरिचय, डाॅ.सुहासिनी इर्लेकर)
  • ज्ञानेश्वरी-टिपण (शब्दकोश) (पुणे विद्यापीठ प्रकाशन)
  • ज्ञानेश्वरी टीका (अध्याय सर्व) (उ.ग. आगाशे)
  • ज्ञानेश्वरी तुमची आमची (आशा प्रधान)
  • ज्ञानेश्वरी दर्पण (रामभाऊ पाटील)
  • श्री ज्ञानेश्वरी दर्शन (रामचंद्र बा. लेगडे)
  • ज्ञानेश्वरी दशरूप दर्शन (हे.वि. इनामदार, चंद्रमा प्रकाशन)
  • श्री ज्ञानेश्वरी नित्यपाठ (मृणालिनी जोशी)
  • ज्ञानेश्वरी-निरूपण खंड १, २ (के.वि. बेलसरे)
  • श्री ज्ञानेश्वरी पदकोश (शिवाजी नरहर भावे)
  • ज्ञानेश्वरी पद्मपराग (रा.ना. चौधरी)
  • ज्ञानेश्वरी परिचय (सदानंद नाईक)
  • ज्ञानेश्वरी पारायण प्रत (ज्ञानेश्वर)
  • ज्ञानेश्वरी पारिजात (भोरूकर)
  • ज्ञानेश्वरी प्रबोध (हे वि इनामदार आणि ग.वा. करंदीकर)
  • ज्ञानेश्वरी-प्रवेशिका (पंडित महादेवशास्त्री जोशी)
  • श्री ज्ञानेश्वरी - भाव, अर्थ, आनंद (अमृत म. जोशी)
  • ज्ञानेश्वरी भावदर्शन भाग १, २ (शंकरमहाराज खंदारकर)
  • ज्ञानेश्वरी म्हणी व वाक्‌प्रचार(गजानन शं. खोले)
  • ज्ञानेश्वरी रहस्य (श्रीनिवास ना. बनहट्टी)
  • ज्ञानेश्वरी व विसावे शतक (स्नेहल तावरे)
  • ज्ञानेश्वरी वाग्विलास दर्शन (शं.कि. चतुरकर)
  • श्री ज्ञानेश्वरी वाङ्मयसुमने व सुवचने (प्रभावती बापट)
  • ज्ञानेश्वरीचे वाङ्मयीन वैभव (डॉ. लीला गोविलकर)
  • ज्ञानेश्वरी विरुद्ध गीता (ग.वा. कवीश्वर)
  • ज्ञानेश्वरी विलसते (उषा देशमुख)
  • श्री ज्ञानेश्वरी विविध दर्शन (शेटे - ढेरे)
  • ज्ञानेश्वरी विशेष चिंतन (नामदेवशास्त्री महाराज, ’सकाळ’मध्ये प्रसिद्ध झालेल्या ७० लेखांचे संकलन)
  • ज्ञानेश्वरी (संस्कृत) प्रथम खंड (म.पा. ओक)
  • ज्ञानेश्वरी सर्वस्व (न.चिं. केळकर)
  • ज्ञानेश्वरी संशोधन (मधुकर रामदास जोशी)
  • श्री ज्ञानेश्वरी-सार (पांडुरंग विनायक सोहोनी)
  • ज्ञानेश्वरी सारामृत (मो.ग. मोघे)
  • ज्ञानेश्वरी सुगम ओवीमय अनुवाद भाग-१ ते ४ .(नचिकेत प्रकाशन)
  • ज्ञानेश्वरी (सुबोधिनी छायेसहित) (गोविंद रामचंद्र मोघे)
  • श्री ज्ञानेश्वरी सुलभ गद्य रूपांतर (केशवरावमहाराज देशमुख)
  • ज्ञानेश्वरी सेवा गौरव ग्रंथ (बळवंत गि. घाटे, मधुकर द. जोशी)
  • ज्ञानेश्वरी सेवा गौरव ग्रंथ (शं.वा. दांडेकर)
  • ज्ञानेश्वरी स्वतंत्रता (म.धु. धोंड)
  • ज्ञानेश्वरी स्वरूप तत्त्वज्ञान आणि काव्य (म.वा. धोंड)
  • ज्ञानेश्वरी ज्ञानकिरणे (अनेक भाग, मा. वि. वाकडे)
  • ज्ञानेश्वरी - ज्ञानकिरणे (स्वामी माधवनाथ)
  • अमृतवर्षिणी - ज्ञानेश्वरीचा मराठी पद्यानुवाद ( कढे, पुष्पलता भालचंद्र, ठाणे)

(अपूर्ण यादी)

ज्ञानेश्वरीची पूर्वपीठिका

संपादन

सारांश

संपादन

अध्याय १

संपादन

ॐ नमोजी आद्या । वेदप्रतिपाद्या । जय जय स्वसंवेद्या । आत्मरूपा ॥१॥ देवा तूंचि गणेशू । सकलार्थमतिप्रकाशु । म्हणे निवॄत्तिदासु । अवधारिजो जी ॥२॥ हें शब्दब्रह्म अशेष । तेचि मूर्ती सुवेष । जेथ वर्णवपु निर्दोष । मिरवत असे ॥३॥

अध्याय २

संपादन

आत्म्याची संकल्पना व त्याचे अमरत्व याचे विवरण. सांख्ययोग, समत्वबुद्धी यांचे विवरण. स्थितप्रज्ञ पुरुषाची लक्षणे.

अध्याय ३

संपादन

कर्माचे महत्त्व व कर्मयोगाची महती.

अध्याय ४

संपादन

कर्मयोगज्ञानयोग यांचे विवरण

अध्याय ५

संपादन

कर्मयोगकर्मसंन्यासयोग यांचे विवरण.

अध्याय ६

संपादन

ध्यानयोगाचे विवरण, मनाची शांती व चंचलता यांचे विवरण.

अध्याय ७

संपादन

प्रकृती, त्रिगुणमाया यांचे विवरण.

अध्याय ८

संपादन

ब्रह्म, अध्यात्म, कर्म यांचे विवरण.

अध्याय ९

संपादन

भगवान कृष्णा ने अर्जुनाला स्वतःविषयी गुह्यतम ज्ञान सांगितले.

अध्याय १०

संपादन

अध्याय ११

संपादन

श्रीकृष्णाच्या विश्व-रूपाचे विवरण.

अध्याय १२

संपादन

भक्तियोगाची लक्षणे व महती

अध्याय १३

संपादन

पंचमहाभूतात्मक शरीर, त्याचे विकार यांची माहिती, ज्ञानअज्ञान यांची लक्षणे, प्रकृतीपुरुष यांची माहिती.

अध्याय १४

संपादन

सत्त्व, रजतम या त्रिगुणांची लक्षणे.

अध्याय १५

संपादन

त्रिगुणात्मक प्रकृतिचे वर्णन आणि संसारवृक्षाचे निरुपण.

अध्याय १६

संपादन

दैवीअसुरी वृत्तीच्या पुरुषांची लक्षणे.

अध्याय १७

संपादन

अध्याय १८

संपादन

पसायदान हे १८व्या अध्यायाचा एक भाग आहे.

बाह्य दुवे

संपादन
 
विकिस्रोत
ज्ञानेश्वरी हा शब्द/शब्दसमूह
विकिस्रोत, या ऑनलाईन मुक्त मराठी ग्रंथालयात पाहा.