भालेकर हे एक मराठी आडनाव आहे. भालेकर हे आडनाव महाराष्ट्रात आढळते. भालेकर हे सैन्याच्या पहील्या फळीतलेे निधड्या छातीचे सैनिक असत. मराठ्यांना भाला व तलवार ही बंदुकीपेक्षा अधिक प्रिय वाटत. मराठा भालाधाऱ्यांना भालेकर, इटेकरी किंवा विटेकरी म्‍हणत. मराठा पायदळ व घोडदळात पाच प्रकारचे भाले वापरात होते : इटा व बर्च्छा (फेकण्याचे) हातातला भाला, सांग किंवा संग (लांब सरळ टोकदार फाळाचा) व फाळाचे टोक बाकदार चोचीसारखे असलेला भाला. हे आयुध साधारणपणे ४ ते ४.५ मीटर लांब असे. मुसलमान बखरकार मराठा भालेकरांना 'गनीम-इ-लाभ' (शापग्रस्त शत्रु) व 'नैझ-बाज' (पट्टीचे भालाधारी) म्हणत. लढाईत भालेकरांच्या अगदी आघाडीला लांब भाले घेतलेल्या रांगा असत त्यांचा उपयोग हल्ला करण्यास होई. रथाच्या मागे व मध्ये पायदळ भालेकरी असत. मराठा समाजातील भालेकर हे मुख्य चिंचवली ता.कणकवली जि सिंधुदुर्ग येथे राहतात. या आडनावाच्या प्रसिद्ध व्यक्ती भालेकर आहेत.