भारती आचरेकर

भारतीय अभिनेत्री

भारती आचरेकर या माणिक वर्मा यांच्या कन्या. त्यांचे पूर्ण नाव सौ.भारती विजय आचरेकर. त्यांची जन्मतारीख १३फेब्रुवारी १९६० ही आहे. भारती आचरेकर या एक उत्तम गायक नाट्य‍अभिनेत्री आहेत.

भारती आचरेकर
भारती आचरेकर
जन्म भारती आचरेकर
१३ फेब्रुवारी, १९६०
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषा मराठी
प्रमुख नाटके हमीदाबाईची कोठी
प्रमुख चित्रपट अगं बाई अरेच्या, वळू
प्रमुख टीव्ही कार्यक्रम वागळे की दुनिया, चोरावर मोर
आई माणिक वर्मा
पती विजय आचरेकर
अपत्ये सिद्धार्थ (पुत्र)

शिक्षण संपादन

वसंतराव कुलकर्णी यांच्याकडे भारती आचरेकरांनी शास्त्रीय संगीताचे धडे घेतले. एस.एन.डी.टी. महाविद्यालयातून संगीत हा विषय घेऊन त्यांनी एम.ए. केले आहे. आई माणिक वर्मा यांना गाण्याच्या कार्यक्रमांत भारतीबाईंनी अनेकदा साथ केली.

त्यांनी कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात मकरंद सोसायटीने बसविलेल्या ’तुझं आहे तुजपाशी’ या नाटकात काम केले होते. त्यातील बेबीराजेंच्या भूमिकेसाठी भारती आचरेकर यांना महाराष्ट्र राज्य नाट्यस्पर्धेत उत्कृष्ट साहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता. मिफ्टा (मराठी इंटरनॅशनल फिल्म अँड थिएटर) २०११ या लंडनमध्ये २२ सप्टेंबर ते २५ सप्टेंबर २०११ यादरम्यान झालेल्या सोहळ्यात त्या नाट्यस्पर्धेच्या तिघांपैकी एक परीक्षक होत्या. जानेवारी-फेब्रुवारीत दूरचित्रवाणीवर मराठी गमभन या कार्यक्रमात झालेल्या अभिनेत्यांच्या गीतगायन स्पर्धेतही त्या परीक्षक होत्या.

कौटुंबिक संपादन

भारती आचरेकर ३४ वर्षांच्या असताना त्यांचे पती विजय आचरेकर अचानक निर्वतले तेव्हा त्यांचा मुलगा सिद्धार्थ ९ वर्षांचा होता. आता (इ.स.२०१३मधे) छायाचित्रणातल्या ’स्पेशल इफेक्ट्स’ मध्ये तो मास्टर आहे. कॉम्प्यूटर गेम्समध्ये त्याने स्पेशलायझेशन केले आहे, त्यात सुवर्णपदकही मिळविले आहे. सून स्वरूपा ही चित्रकार आहे. हे दोघेही परदेशात स्थायिक झाले आहेत.

भारती आचरेकरांनी भूमिका केलेली मराठी नाटके :
 • चारचौघी
 • ती वेळच तशी होती
 • थांब लक्ष्मी
 • दुभंग
 • धन्य ते गायनी कळा
 • नस्तं झेंगट
 • पप्पा सांगा कुणाचे
 • महासागर
 • मार्ग सुखाचा
 • मुखवटे
 • विठोबा रखुमाई
 • सख्या
 • हमीदाबाईची कोठी
 • हा मार्ग सुखाचा
चित्रपट :
 • अगं बाई अरेच्या
 • चमेली की शादी (हिंदी)
 • बेटा (हिंदी)
 • वळू
 • संजोग (हिंदी)
दूरदर्शन मालिका
 • अपराधी कौन
 • आ बैल मुझे मार
 • कच्ची धूप
 • चिडियाघर
 • चेहेरे
 • चोरावर मोर
 • दर्पण
 • बुनियाद
 • वागळे की दुनिया

संदर्भ संपादन