भारतीय वाद्यवर्गीकरण पद्धती
भारतीय शास्त्रीय संगीतामध्ये वाद्यांचे वर्गीकरण करण्याचा प्रथम स्पष्ट प्रयत्न भरतमुनींच्या नाट्यशास्त्र या ग्रंथात आढळतो. वाद्याच्या ध्वनी उत्पन्न करण्याच्या तंत्रानुसार त्यांनी पुढीलप्रमाणे वर्गीकरण केले आहे.
- सुषिर वाद्ये : हवेच्या प्रवाहाचा वापर करून ध्वनी उत्पन्न करणारी वाद्ये
- बासरी
- सनई
- संवादिनी (हार्मोनियम)
- इत्यादि
- तत वाद्ये : तंतूंच्या कंपनातून ध्वनिनिर्मिती करणारी वाद्ये
- सतार
- सारंगी
- व्हायोलिन
- इत्यादि
- घन वाद्ये : वाद्याच्या पॄष्ठभागावर आघात करून ध्वनी निर्माण करणारी वाद्ये
- घंटा
- झांज
- चायना ब्लॉक
- इत्यादि
- अवनद्ध वाद्ये : मढवलेली वाद्ये
- तबला
- मॄदंग
- ड्रम
- इत्यादि