भारतीय रुपयाच्या २०१६तील नवीन नोटा
भारत सरकारने वापरात असलेल्या ५०० आणि १००० रुपये किंमतीच्या नोटा ८ नोव्हेंबर २०१६ च्या मध्यरात्रीपासून रद्द केल्या आणि त्याजागी ५०० आणि २००० किंमतीच्या नव्या नोटा जारी करण्याचा निर्णय घेतला. या नव्या नोटा अनेक बाबतीत जुन्या नोटांपेक्षा वेगळ्या आहेत, त्यांची वैशिष्ट्ये :-
५०० रुपयाच्या नोटेच्या विशेषता
संपादन- आकारमान ६६ मिमी X १५० मिमी
- रंग : हिरवटसर राखाडी (स्टोन ग्रे)
- नोटेच्या दर्शनीय भागात महात्मा गांधीचे उजव्या बाजूला तोंड असणारे छायाचित्र आहे. याआधीच्या नोटेवर गांधींजीचे छायाचित्र हे डाव्या बाजूला तोंड करून होते.
- आधीच्या नोटेपेक्षा या नोटेचे आकारमान कमी आहे.
- नोटेच्या मागच्या बाजूला स्वच्छ भारत अभियानाचा लोगो आहे. तसेच लाल किल्ल्याची प्रतिमा आहे.
नजर कमी असलेल्या व्यक्तींसाठी
संपादन- उजव्या बाजूला ५०० या आकड्यासाह एक वर्तुळ उचललेल्या छपाईत
- उजवीकडे व डावीकडे वर उचललेल्या छपाईत ५ ब्लीड लाईन्स.
२००० रुपयाच्या नोटेच्या विशेषता
संपादन- आकारमान ६६ मिमी X १६६ मिमी
- रंग: मॅजेंटा (गडद गुलाबी रंग)
- नोटेच्या दर्शनी भागात भारताने अंतराळात सोडलेल्या मंगलयानाची प्रतिमा.
नजर कमी असलेल्या व्यक्तींसाठी
संपादन- उजव्या बाजूला २००० या आकड्यासह आडवा आयत उचललेल्या छपाईत
- उजवीकडे व डावीकडे वर उचलेल्या छपाईत ७ ब्लीड लाईन्स
५०० आणि २००० रुपयांच्या नोटांमधील साम्ये
संपादन- मूल्याचा आकड्यांचे आरपार (सी थ्रू) मुद्रण. हा आकडा फक्त नोट प्रकाशाकडे रोखल्यावर दिसतो.
- मूल्याच्या आकड्याची लपलेली (लेटेंट) प्रतिमा. ही नोट तिरपी केल्यावर दिसते.
- मूल्याचा आकडा देवनागरी लिपीत.
- महात्मा गांधीच्या चित्राची बदललेली अभिमुखता तिच्या जागेत बदल. या छापील चित्राखेरीज उजवीकडील कोऱ्या जागेत वाॅटरमार्क स्वरूपात गांधींची प्रतिमा.
- नोट तिरपी केल्यास सुरक्षा धाग्याचा हिरवा रंग बदलून निळा दिसतो. धाग्यावर छोट्या अक्षरात आरबीआय आणि मूल्याचा आकडा लिहिला आहे.
- रक्कम अदा करण्याची हमी देणारे वचन, रिझर्व बँकेच्या गव्हर्नरची स्वाक्षरी आणि बँकेचे चिन्ह उजवीकडे सरकविण्यात आले आहे.
- प्रतिमा आणि इलेक्ट्रोटाईप वॉटर मार्क.
- संस्था पॅनलवर वाढत्या आकारमानाचे आकडे डावीकडून वर आणि उजवीकडे खाली.
- आकड्यातील मूल्य रुपयाच्या चिन्हासह रंग बदलणाऱ्या शाईत (हिरव्यावरून निळा), उजवीकडून खाली
- उजवीकडे अशोक स्तंभाचे चिन्ह.