राष्ट्रीय ग्राहक दिन (भारत)

(भारतीय ग्राहक दिन या पानावरून पुनर्निर्देशित)

राष्ट्रीय ग्राहक दिन हा दरवर्षी २४ डिसेंबर रोजी भारतात साजरा केला जातो. इ.स. १९८६ साली २४ डिसेंबर या दिवशी ग्राहक हक्क कायद्याला भारताच्या राष्ट्रपतींनी मंजुरी दिली होती. तेव्हापासून २४ डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून साजरा केला जातो. हा कायदा अस्तित्वात यावा यासाठी अनेक संस्था आणि कार्यकर्त्यांना प्रयत्न करावे लागले होते.[१] ग्राहक संरक्षण कायद्यानुसार प्रत्येक भारतीय ग्राहकाला सहा हक्क मिळाले आहेत.

  • सुरक्षेचा हक्क
  • माहितीचा हक्क
  • निवड करण्याचा अधिकार
  • म्हणणे मांडण्याचा हक्क
  • तक्रार व निवारण करून घेण्याचा हक्क
  • ग्राहक हक्कांच्या शिक्षणाचा अधिकार

ग्राहकांना मदत संपादन

ग्राहकांना देण्यात आलेल्या अधिकारांचे आणि हक्कांचे संरक्षण व्हावे म्हणून भारताच्या केंद्र सरकारकडून हेल्पलाइन चालविण्यात येते. केंद्र सरकारकडून चालविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाइनच्या १८००११४००० या टोल फ्री क्रमांकावर तक्रारी करण्यात येतात. तसेच, www.nationalconsumerhelpline.in या वेबसाइटवरही तक्रारी नोंदवल्या जातात.[२] ग्राहकांना येणाऱ्या अडचणी, तक्रारींबाबत हेल्पलाइनकडून मार्गदर्शन करण्यात येते. ग्राहकांनी विकत घेतलेल्या वस्तू किंवा सेवांमध्ये काही त्रुटी असतील, त्याबाबत काय तक्रार करावी, कुठे तक्रार करावी, त्याची नेमकी प्रक्रिया काय आहे, याची सर्व माहिती हेल्पलाइनद्वारे लोकांना देण्यात येते.

संदर्भ आणि नोंदी संपादन

  1. ^ तुषार कुलकर्णी (२४ डिसेंबर २०१७). "ग्राहक म्हणून मिळालेले हे ६ हक्क तुम्हाला माहिती आहेत?". बी.बी.सी. मराठी. २४ डिसेंबर २०१७ रोजी पाहिले.
  2. ^ वंदना घोडेकर (२४ डिसेंबर २०१७). "राज्यातील ग्राहक सजग". महाराष्ट्र टाइम्स. २६ डिसेंबर २०१७ रोजी पाहिले.