भारतीय कला
भारतीय कलेमध्ये विविध कला प्रकार समाविष्ट आहेत. त्यामध्ये शिल्पकला, मुर्तीकारी, चित्रकला, विणकाम इ. कलांचा समावेश होतो. भौगोलिकरित्या ह्या कला संपूर्ण भारतीय उपखंडात पसरलेल्या आहेत ज्यात भारतासह, पाकिस्तान आणि बांगलादेशचा समावेश आहे.[१]
नक्क्षीकारीचे उत्तम ज्ञान हे भारतीय कलेचे वैशिष्ट्य आहे आणि ते आपण प्राचीन तसेच आधुनिक प्रकारांमध्ये बघू शकतो.
भारतीय कलेचा उगम इ.स.पु. ३००० पासून आपण बघू शकतो. आधुनिक कलेच्या प्रवासात त्यावर सांस्कृतिक (उदा. सिंधू आणि ग्रीक) तसेच धार्मिक प्रभाव जसे कि हिंदू, बुद्ध, जैन आणि मुस्लिम बघावयास मिळतो. असे हे धार्मिक परंपरांचे जातील मिश्रण असतांना सुद्धा प्रचलित कलात्मक शैलीचा मोठ्या धार्मिक संघांनी आदर केला.[२]
प्राचीन कलेमध्ये दगड तसेच धातूचे शिल्प, विशेषतः धार्मिक शिल्प भारतीय वातावरणाचा सामना करत इतर प्रकारच्या शिल्पांपेक्षा अजूनही उत्तम स्थितीत आहेत.
भारतीय कलेचा संदर्भिक इतिहास
संपादनमंदिरांची कला
संपादनहडप्पा संस्कृतीचा अस्त आणि मौर्य साम्राज्यांपासून सुरू झालेल्या निश्चित इतिहास काळाची सुरुवात यामधला काळ विस्मरणात गेला आहे आणि इतिहासातील प्रमुख कलात्मक स्मारकांवर प्रभाव टाकणारा सर्वात पहिला धर्म हिंदू धर्म आहे.[३] जरी लाकडांपासून बनवलेली काही प्राचीन स्मारके नंतर दगडाची केली गेली असली तरी त्याचा पुस्तकी संदर्भ सोडला तर कुठलाही भौतिक पुरावा सापडलेला नाहीये. भारतीय कलेमध्ये हे सतत निदर्शनास आले आहे कि विविध धर्म एका विशिष्ट कालखंडात आणि ठिकाणी जवळपास सारखीच कलाशैलीचा वापर करतात.[४] कदाचित सारखेच कलाकार त्यांच्या धर्माव्यतिरिक्त इतरही धर्मांसाठी काम करत असतील.
लोक कला आणि आदिवासी कला
संपादनभारतात लोक आणि आदिवासी कलेचे विविध रूपे आहेत; कुंभारकाम, चित्रकारी, धातुकाम , कागद कला, विणकाम, आभूषणे बनविणे, खेळणे बनविणे इ. ह्या फक्त शोभेच्या गोष्टी नसून लोकांच्या जीवनात त्यांचे विशेष महत्त्व आहे आणि त्या त्यांच्या परंपरा आणि विधींशी जोडलेल्या आहेत.[५]
विविध सामाजिक संगठना तसेच भारत सरकार ह्या कलांना जपण्यासाठी प्रयत्नशील आहे. ह्या कलांचा अभ्यास करण्यासाठी जागतिक स्तरावरील स्कॉलरशिप उपलब्ध आहेत.