भाऊ दाजी लाड वस्तुसंग्रहालय

या दालनांत प्रामुख्याने म्हैस आणि गवा यांच्या शिंगापासून बनविलेल्या वस्तू, नक्षीकाम केलेली माती आणि विविध धातूंची भांडी, हस्तिदंतावर केलेली कलाकुसर, लाकडावर प्राण्यांच्या हाडांवर, शंख शिंपल्यांवर केलेली कलाकुसर, विविध धातूंपासून मूर्ती, राधा-कृष्ण आदींची विविध शैलीतील चित्रे अशा अनेक वस्तूंचे सुरेख मांडणी करण्यात आलेली आहे. याच दालनाच्या मध्यभागी माऊट स्टुअर्ट एलफिस्टन (मुंबईचा गव्हर्नर १८१९-१८२७), प्रिन्स अल्बर्ट आणि क्वीन व्हिक्टोरिया (ब्रिटनची राणी १८३७-१९०२) आणि डेव्हिड ससून यांचे पुतळे ठेवण्यात आले आहेत.

मुंबईतील मूळ जागेवरून येथे आणलेले पुतळेसंपादन करा

लॉर्ड हार्डिग्स (गव्हर्नर जनरल; मूळ ठिकाण - अपोलो बंदर, मुंबई), एडविन एस. मॉनटाग्यू (मॅजेस्टी प्रिन्सिपल ॲन्ड सेक्रेटरी ऑफ स्टेट ऑफ इंडिया - मूळ ठिकाण - मरिन लाईन्स मैदान), डॉ. थॉमस ब्लाने (पब्लिक सर्व्हिस, मूळ ठिकाण - फोर्ट), सर रिचर्ड टेम्पल बॅरोनेट (गव्हर्नर ऑफ बॉम्बे, मूळ ठिकाण - एस्प्लेनेड, मुंबई), लॉर्ड मक्यूस ऑफ व्हॅलेस्टी (गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया, मूळ ठिकाण - फोर्ट, मुंबई), लॉर्ड सॅंडहर्स्ट (गव्हर्नर जनरल, मूळ ठिकाण एस्प्लेनेड, मुंबई), क्वीन व्हिक्टोरिया (ब्रिटनची राणी, मूळ ठिकाण - फोर्ट.) असे विविध ठिकाणांहून आणलेले पुतळे संग्रहालयाबाहेर आहेत.

संदर्भ आणि नोंदीसंपादन करा

  1. ^ कुठे आहे पेशव्यांनी तयार केलेला मुंबईचा नकाशा?. BBC News मराठी. 20-05-2018 रोजी पाहिले. 'व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट म्युझियम' नावानं सुरुवातीला हे संग्रहालय ओळखलं जायचं. 1975मध्ये या संग्रहालयाच्या संस्थापकांपैकी एक असलेले डॉ. रामकृष्ण विठ्ठल उर्फ भाऊ दाजी लाड यांच्या स्मरणार्थ त्याचं नाव या संग्रहालयास देण्यात आलं. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)