भांडवलशाही
(भांडवलवाद या पानावरून पुनर्निर्देशित)
भांडवलशाही ही एक अशी तत्त्वप्रणाली आहे, ज्यात उत्पादनाच्या साधनांची मालकी बव्हंशी अथवा पूर्णपणे खाजगी क्षेत्राकडे असते व ह्या साधनांचा मुख्यत्वे नफा मिळवण्याच्या हेतूने वापर केला जातो. अशा तत्त्वप्रणालीमध्ये अर्थव्यवस्थेतील गुंतवणूक, वितरण, आय, उत्पादन, तसेच मालाच्या आणि सेवांच्या किमतींचे नियमन ह्या सर्व गोष्टी बाजारातील शक्तींवर सोपवलेल्या असतात.