भगवानबाबा (मालिका)
भगवानबाबा ही राजयोगी महंत श्री संत भगवानबाबा यांच्या चरित्रावर आधारीत साधना या आध्यात्मिक वाहिनीवरून प्रक्षेपित केली जाणारी दूरचित्रवाहिनी मालिका आहे. तिचे प्रक्षेपण दिनांक ३ ऑक्टोबर, इ.स. २०१२ पासून चालू केले जाणार आहे. या मालिकेचे पहिल्या २० भागांचे चित्रीकरण पूर्ण झाले असून डॉ.विलास उजवणे हे भगवानबाबांच्या भूमिकेत काम करत आहेत. सतीश परदेशी हे या मालिकेचे दिग्दर्शक असून पुणे येथील द टायगर फिल्म्स अँड एन्टरटेनमेंटतर्फे रमेश स्स्ते यांनी या मालिकेची निर्मिती केली आहे. या मालिकेमुळे संत भगवानबाबा यांचे आध्यात्मिक व सामाजिक जीवन प्रथमच छोट्या पडद्यावर येणार आहे.
भगवानबाबा | |
---|---|
प्रकार | मालिका |
दिग्दर्शक | सतीश परदेशी |
निर्माता | रमेश स्स्ते |
निर्मिती संस्था | द टायगर फिल्म्स अँड एन्टरटेनमेंट, पुणे |
कलाकार | डॉ.विलास उजवणे, प्रकाश धोत्रे, राघवेंद्र कडकोळ, रवी पटवर्धन, वृंदा बाळ, पोपट चव्हाण, निकिता कुलकर्णी, सीमा पिसे, महेश शेजवळ |
देश | भारत |
भाषा | मराठी |
एपिसोड संख्या | २० |
निर्मिती माहिती | |
प्रसारणाची वेळ | ३० मिनिटे |
प्रसारण माहिती | |
वाहिनी | साधना |
पहिला भाग | ३ ऑक्टोबर, २०१२ |
प्रथम प्रसारण | ३ ऑक्टोबर, २०१२ – |
कलाकार
संपादनविलास उजवणे यांच्याबरोबरच प्रकाश धोत्रे, राघवेंद्र कडकोळ, रवी पटवर्धन, वृंदा बाळ, पोपट चव्हाण, निकिता कुलकर्णी, सीमा पिसे, महेश शेजवळ हे कलाकारही या मालिकेत काम करत आहेत.