ब्लाउवबर्गची लढाई तथा केप टाउनची लढाई ८ जानेवारी, १८०६ रोजी युनायटेड किंग्डम आणि बटाव्हियाचे प्रजासत्ताक यांच्यात दक्षिण आफ्रिकेतील केप टाउन शहराजवळ झालेली लढाई होती. ५,४०० ब्रिटिश आणि सुमारे २,००० शत्रुसैनिकांच्यातील या लढाईत ब्रिटिशांचा विजय झाला व केप टाउन व आसपासच्या प्रदेशावरील त्यांची सत्ता कायम झाली.