ब्रॅड पिट (इंग्लिश: Brad Pitt) हा प्रसिद्ध अमेरिकन हॉलीवुड अभिनेता व निर्माता आहे. त्याला अनेक पुरस्कार व नामांकने मिळालेली आहेत. फाइट क्लब, ओशियन्ज सिरीज, ट्रॉय, मिस्टर अ‍ॅन्ड मिसेस स्मिथ, वर्ल्डवार झी, दि क्युरिअस केस ऑफ बेंजामिन बटन, मनीबॉल इत्यादि नावाजलेल्या चित्रपटांत अभिनय केला आहे. प्लान बी एंटरटेनमेंट ही त्याची निर्मिती कंपनी आहे.

ब्रॅड पिट
जन्म विलियम ब्रॅडली पिट
१८ डिसेंबर, १९६३ (1963-12-18) (वय: ५६)
शॉनी, ओक्लाहोमा
कार्यक्षेत्र हॉलिवूड अभिनेता व निर्माता
कारकीर्दीचा काळ १९८७ ते चालू
अपत्ये शायलो नुवेल, नॉक्स लीओन, विवियन मर्शलिन