ब्रह, रुद्र, महेश्वर संकल्पना

[]
।। श्री ।।
जैमिनी सूत्रम

जैमिनी सूत्रम व्दितीय अध्याय – आयुर्दोय विचार यामध्ये ब्रहम् रुद्र महेश्वर संकल्पना सांगितली आहे.
ब्रहम = जन्म, रुद्र = रडणे व महेश्वर = मृत्यु
आयुर्दोय हा ब्रहम् ग्रहापासून ते महेश्वर ग्रहपर्यंत असतो.

1. रुद्र : -
पितृलाभ-भावेशप्राणी रुद्र: ।।
अप्राण्यपि पाप-दृष्ट: ।।

लग्न किंवा सप्तम स्थानांच्या बलवान अष्टमेश हा ‘रुद्र’ असतो. रुद्र म्हणजे नाश करणारा/रडवणारा, एकूण ११ रूद्र असतात. गुरू ज्या राशीत आहे ती राशी रुद्र राशी होऊ शकत नाही. म्हणून इतर 11 राशी रुद्र असतात किंवा होऊ शकतात.
लग्न किंवा सप्तम स्थानांच्या अष्टम स्थानांचा स्वामी जर कमजोर असेल व त्यावर पापग्रह दृष्टी/युती असेल तर हा ग्रह सुदूधा रुद्र ठरतो. सर्वराधारणपणे बलवान स्वामी रुद्र असतो. रुद्र = त्रिशूल, कारण त्रिशूल हे रुद्राचे शस्त्र आहे व त्याला 3 टोके आहेत.

2. महेश्वर : -
स्वभावेशो महेश्र्वरः ।।
स्वोच्चे स्वभे रिपुभावेश-प्राणी ।।
पाताभ्यां योगे स्वस्य तयोर्वा रोगे ततः ।।

रुद्रा पेक्षा वरच्या पातळीवर (स्थान) स्थित महेश्वराला दर्जा दिला आहे. आत्माकारकापासून अष्टमाचा स्वामी महेश्वर असतो.

नियम १ – जर आत्माकारकाच्या अष्टम स्थानाचा उच्चीचा/स्वराशीचा असेल तर तो चांगल्या अर्थाने बलवान होतो, व मृत्यु देण्याची त्याची क्षमता कमी होते. अशावेळी आत्माकारका पासून व्यय स्थानाचा बलवान स्वामी महेश्वर होईल. तो ही उच्च/स्वराशीत असेल तर आत्माकारकापासून अष्टमस्थानापासून अष्टम म्हणजे आत्माकारकापासून तृतीय स्थानाचा स्वामी महेश्वर ठरतो.

नियम २ – जर राहु केतु आत्माकारक होत असता, राहु केतु आत्माकारका पासून प्रथम/अष्टम स्थानात असता राहुपासून ६ वा ग्रह महेश्वर ठरतो. रविवार, सोमवार, मंगलवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार राहु केतु याप्रमाणे क्रमाने राहुपासून ६ वा बुध येईल. व केतुपासून ६ वा गुरू येईल. अशावेळी हे ग्रह (६ वे आलेले) महेश्वर ठरतील.

नियम ३ – जर राहु केतु आत्माकारका बरोबर युतीत असता किंवा अष्टम स्थानी असता AK (आत्माकारक) पासून षष्ठस्थानाचा स्वामी महेश्वर होईल. राहु केतुच्या विरुदूध बाजूने मोजल्यास षष्ठ स्थान हे त्यांचे अष्टम स्थान येते.

नियम ४ – जर हा षष्ठेश पण उच्चीचा/स्वराशीचा असता या पासून अष्टम/व्दादश स्थानाचा बलवान स्वामी महेश्वर ठरतो. ‘रुद्र’ जे जे उत्पन्न होते त्याचा नाश करतो, व उत्पन्न-नाश अशी प्रक्रिया सतत चालू राहते. अकरा रुद्रा पैकी एक महेश्वर असतो, जो आत्माला मनाच्या बंधनातून मुक्त करतो. उरलेले दहा रुद्र पंचज्ञानेंद्रिय व पंचकर्मेंद्रिय शरीराचे रक्षण करतात. प्रत्यक्षात शरीराचा नाश होताना आधी १० रुद्रांचा पंचज्ञानेंद्रिय व पंजकर्मेंद्रिय यांचा नाश होतो. मग महेश्वराच्या मदतीने आत्मा मनाच्या बंधानातून मुक्त होते. राहु/केतु हे ही यासाठी मदत करतात. राहु शरीरातील व्दादश आदित्य व चंद्राचा प्रभाव नष्ट करतो. तर केतु हा पाच तत्त्वांचा नाश करतो. व हळूहळू (सावकाश) शरीर नष्ट होते. शिवाचे (रुद्राचे) शस्त्र = त्रिशूल आहे. जे विदूध्वंस/संहार करते, म्हणुन यासाठी शूलदशा पहावी किंवा शूलदशा पहाताना महेश्वर ग्रह महत्त्वाचा ठरतो. असा जैमिनीय मत आहे.

3. ब्रहमा : -
प्रभुभाववैरीशप्राणी पितृलाभप्राण्यनुचरो विषमस्थो ब्रहम् ।।
ब्रहम्णि शनौ पातयोर्वा ततः ।।
बहूनां योगे स्वजातीयः ।।
राहुयोगे विपरीतम् ।।
ब्रहम् स्वभावेशो भावस्थः ।।
विवादे बली ।।

स्थिर दशा निश्चित करणयासाठी तसेच मारक ग्रहाचा अंदाज घेण्यासाठी ‘ब्रहम्’ या ग्रहाचा उपयोग होतो. ब्रहम् काढण्यासाठी खालील नियम पाहुया –

१. लग्न व सप्तम यापैकी बलवान स्थान काढावे व यापासून ६,८,१२ स्थानांचे स्वामी काढावेत. यापैकी बलवान ग्रह जर विषम राशीत असून दृश्य गोलार्धात ही असेल तर तो ‘ब्रहम्’ या संज्ञेस पात्र ठरतो. दृश्य गोलार्ध पाहताना लग्नाच्या दृष्टिने १२,११,१०,९,८,७ ही स्थाने तर सप्तमाच्या दृष्टिने १,२,३,४,५,६ ही स्थाने पहावीत.

२. वरील प्रमाणे बलवान ग्रह काढता आला नाही तर लग्न व सप्तम मधील कमजोर स्थानापासून ६,८,१२चा स्वामी शोधावा.

३. तरीही ब्रहम् ग्रह सिद्ध होत नसेल तर अदृश्य गोलार्धाचा उपयोग करावा. (दृश्य गोलार्ध ही अट सोडून दयावी). अदृश्य गोलार्ध – विषमरास

४. या प्रमाणे ही ‘ब्रहम्’ सिद्ध होत नसेल तर समराशीचा विचार करावा (विषम रास ही अट ही सोडून दयावी)

५. जर शनि राहु केतु ब्रहम् ठरत असतील तर त्यापासून ६वा स्वामी (आठवडयाच्या दिवसाच्या क्रमाने) ग्रह ब्रहम् ठरतो. राहु = बुध, केतु = गुरू, शनि = मंगल हे ब्रहम् ठरतात.

६. एकापेक्षा जास्त ग्रह ब्रहम् ठरत असतील तर ज्या ग्रहाचे स्पष्ट अंश जास्त आहेत तो ग्रह ‘ब्रहम्’ असतो. राहु/केतुचे अंश शेवटुन मोजावते 30 तून राहु/केतु वजा करावा म्हणजे स्पष्ट अंश मिलतात.

७. आत्माकारक पासून अष्टमेश अष्टमात असेल तर तो अष्टमेश ब्रहमा ठरतो. (संजय रथ)

८. दोन ग्रहापेक्षा/जास्त ग्रहापेक्षा जास्त ग्रह ब्रहमा ठरत असल्यास त्यातील बलवान ग्रह ‘ब्रहम्’ ठरवावा. (जर अंश सारखेच असतील तर).


अशाप्रकारे ‘रुद्र’, ’महेश्वर’ व ’ब्रहम्’ ग्रहांची संकल्पना आहे.

  1. ^ जैमिनी सूत्रम, व्याख्याकार - आचार्य पं. लसणलाल झा