दिवसाच्या २४ तासांमध्ये ३० मुहूर्त असतात. म्हणजे एक मुहूर्त ४८ मिनिटांचा. ब्रह्म मुहूर्त हा रात्रीचा ४था प्रहर असतो. सूर्योदयाच्या आधीच्या प्रहरात दोन मुहूर्त असतात; त्यांतल्या पहिल्या मुहूर्ताला ब्रह्म मुहूर्त म्हणतात. त्याच्यानंतर विष्णूची वेळ सुरू होते, म्हणजे सकाळ होते पण सूर्य दिसत नाही. ब्रह्म मुहूर्त म्हणजे घड्याळ्यातील प्रातःकालचा ४ वाजून २४ मिनिटे ते ५ वाजून १२ मिनिटे हा काळ.