बोस्कीच्या गोष्टी हा कवी आणि लेखक गुलजार यांनी लिहिलेल्या पुस्तकांचा संच आहे. .ही पुस्तके मूळ हिंदीत असून त्यांचे विविध लेखकांनी मराठी अनुवाद केले आहेत. पुस्तकांची ही मालिका ग्रंथाली प्रकाशन संस्थेने मराठीत आणली आहे.

जुन्या-नव्या पिढीतील ज्या लेखकांनी ही पुस्तके अनुवादित केली आहेत, त्यांत बोस्की (उषा मेहता), बोस्कीची गिनती (अंबरीश मिश्र), बोस्कीचा जंगलनामा (किशोर मेढे), बोस्कीची सुनाली (अमृता सुभाष), बोस्कीचे अजबगजब धनवान (अमृता सुभाष), बोस्कीचे पंचतंत्र (सविता दामले), बोस्कीचे तळ पाताळ (मधुकर धर्मापुरीकर), बोस्कीच्या गप्पागोष्टी (मधुकर धर्मापुरीकर) आणि कॅप्टनकाका (विजय पाडळकर) या नऊ पुस्तकांचा समावेश आहे

बोस्कीच्या गोष्टी या पुस्तक मालिकेबद्दल ग्रंथाली प्रकाशनाला मसापचा विशेष पुरस्कार मिळाला आहे.