बोलँड पार्क

(बोलँड बँक पार्क या पानावरून पुनर्निर्देशित)

बोलंड बँक पार्क हे दक्षिण आफ्रिकेतील पार्लमधील एक बहुउपयोगी मैदान आहे. सध्या ते जास्त करून क्रिकेटसाठी वापरले जाते. २००३ क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतील ३ सामने ह्या मैदानावर झाले होते. बोलंड क्रिकेट संघ आणि केप कोब्राझ ह्या दोन्ही संघाचे घरचे सामने ह्या मैदानावर होतात. मैदानाची प्रेक्षक क्षमता १०,००० इतकी आहे.

१९९७ साली त्रिकोणी मालिकेमध्ये भारत वि झिम्बाब्वे एकदिवसीय सामना हा येथे खेळवला गेलेला पहिला सामना होता, जो बरोबरीत सुटला.

बाह्यदुवे संपादन