बोनेलीचा गरुड
मोरघी किंवा बगळ्या मोरगा (इंग्लिश: bonelli's Eagle; हिंदी:मोरंगी; गुजराती:सांसागर; संस्कृत:मयूरघ्नी, सिंहल श्नेयक; तेलुगू: कुदेली सलव) हा एक शिकारी पक्षी आहे.
ओळख
संपादनहा आकाराने घारीपेक्षा मोठा,किरकोळ आणि तुरा नसलेला असतो. याच्यावरील अंगाचा रंग गर्द धुरकट व पिंगट.खालील भाग पांढरा-तांबूस.त्यावर काळसर काड्या.शेपटीचा वरील रंग गर्द राखाडी. खालील भागावर काळे पट्टे. नर-मादी दिसायला सारखे असले,तरी मादी आकाराने मोठी असते.
हा पक्षी पूर्व बंगाल वगळता भारतात सर्व ठिकाणी आढळून येतो.
या पक्ष्याची डिसेंबर ते जानेवारी या काळात भारतात वीण होते.
संदर्भ
संपादन- पक्षिकोश - मारुती चितमपल्ली