बॉर्डर्स अँड बाउंडरीझ: विमेन इन इंडियाझ पार्टिशन

‘बॉरडरस अंड बाउंडरिज: विमेन इन इंडियास पार्टीशन’ हे पुस्तक १९८८ मध्ये भारतीय स्त्रीवादी लेखिका रितू मेनन व कमला भसीन द्वारे ‘काली फॉर विमेन’ या स्त्रीवादी प्रकाशन संस्थेद्वारे प्रकाशित करण्यात आले. या पुस्तकाद्वारे लेखिका स्त्रियांच्या अनुभवांना फाळणीच्या केंद्रस्थानी आणून १९४७च्या भारताच्या फाळणीचे स्त्रीवादी इतिहासलेखन करतात. फाळणीचे लिंगभावात्मक दृष्टीने अभ्यास करणाऱ्या विविध इतर पुस्तकांमध्ये (उर्वशी बुटालीयाचे 'The Other Side of Silence') या पुस्तकाचे ही महत्त्वाचे स्थान आहे.

महत्त्वाच्या संकल्पनासंपादन करा

स्त्रियांच्या लैंगिकतेची भूमिका व त्यावरील नियंत्रण, स्त्रियांच्या आयुष्यात समुदाय, धर्म, कुटुंब व राष्ट्र-राज्य याची भूमिका व स्त्रियांबाबत राज्याने स्वीकारलेले ‘माई-बाप’ किंवा प्रदान-करणारा/ संरक्षक ही भूमिका या पुस्तकाचा महत्त्वाचा भाग

पुस्तकाचे सारांशसंपादन करा

पद्धती व पद्ध्तीशास्त्रसंपादन करा

या पुस्तकात लेखिकांनी स्त्रीवादी पद्ध्तीशास्त्राचा तसेच unstructured मुलाखती व मौखिक इतिहासाचा उपयोग केलेला आहे.

प्रकरणसंपादन करा

स्त्रियांच्या अनुभवातून उद्भवणाऱ्या सहा मुद्यांच्या (हिंसा, पळवणे व पुनर्प्राप्ती करणे, वैधव्य, स्त्रियांचे पुनर्वसन, पुनर्बांधणी व मालकी) आधारे लेखिका पुस्तकाची रचना करतात.

पुस्तकातील पहिले प्रकरण ‘Speaking For Themselves’ हे प्रस्तावनेची भूमिका निभावते. येथे लेखिका आठवणींवर काम करण्यामधील अडचणी मांडतात. त्यांच्या मते आठवणी या चक्रीय, विस्कळीत व विसंगत असू शकतात. तसेच या प्रकरणात मेनन व भसीन ‘इतिहास सांगण्याची कृती’ व ‘आठवणींचे इतरांना असलेले फायदेही’ अधोरेखित करतात. तसेच स्त्रीवादी संशोधनाचे तत्व अवलंबून त्या स्वतःचे सामाजिक व राजकीय स्थान संशोधनात मांडतात तसेच संशोधनात वापरलेल्या पद्धती व कामाचे बदलते स्वरूप ही संशोधन प्रक्रियेत मांडतात.

‘Honourably Dead’ या दुसऱ्या प्रकरणात, लेखिका फाळणीचे सुरुवातीचे रक्तरंजित महिन्यातील स्त्रियांचे अनुभव व त्या काळात अनुभवास येणारी भीती, दहशत व अनिश्चितता व स्त्रियांच्या आत्महत्येचा मुद्दा अधोरेखित करतात. स्त्री व पुरुष कसे वेगवेगळ्या पद्धतीने ‘निवड करण्याचे स्वातंत्र्य’ या मुद्याचे घटक व मर्यादांची चर्चा करत किंवा फाळणी नंतर हयात असलेल्या महिलांनी कशा पद्धतीने त्या मर्यादा ओलांडल्या या बाबतीतील चर्चे द्वारे फाळणीच्या काळातील स्त्रियांच्या आत्महत्यांच्या वेगवेगळ्या आवृत्या रचल्या हे सुद्धा लेखिका स्पष्ट पणे दाखवून देतात.

‘Borders and Bodies’ व ‘A Community of Widows’ या पुढील दोन प्रकरणांमध्ये मेनन व भसीन फाळणीच्या वेळेस पळवून आणलेल्या किंवा विधवा स्त्रियां बाबत भाष्य करतात. समाज कार्यकर्ते व फाळणी नंतर हयात असलेल्या स्त्रियांसोबत घेतलेल्या मुलाखती द्वारे त्या दाखवून देतात कि कशा पद्धतीने राज्य या दोन श्रेणीतील बायकांना वेगवेगळ्या पद्धतीने बघत होते. तसेच त्यांच्या बाबत निर्णय घेताना राज्य समुदाय व कुटुंब या संस्थेशी जुळवून कसे कार्य करत होते हे सुद्धा त्या दाखवून देतात.

पुढील प्रकरण ‘Picking up the pieces’ हे पुनर्वसन करण्यात अग्रेसर असलेल्या स्त्रियांच्या मुलाखतींवर आधारित आहे. ‘पुनर्वसनाची गरज असलेल्या’ स्त्रियांबाबत त्या कशा विविध प्रकारच्या भूमिका घेतात हे त्या दाखवून देतात. तसेच कर्तेपणा, सत्ता, नैतिकता व नीतीशास्त्र या धरणांना अधिक क्लिष्ट करण्यासाठी या स्त्रियांच्या कथा कशा पद्धतीने उपयोगी ठरतील हे सुद्धा ते अधोरेखित करतात.

‘Learning to Survive’या प्रकरणात दोन भिन्न स्त्रियांचे फाळणी नंतरच्या आयुष्याचे जीवनकथन आहेत. त्यातील एका महिलेनी स्वतः साठी स्वातंत्र्याचे व पूर्णत्वाचे आयुष्य घडवून या दुखद अनुभवाचे रुपांतर संधीत केले. तर दुसरी कधीच फाळणीतील घटनांनी इतकी भेदरली कि कधीच ना सावरू शकण्याची भावना तिच्यात निर्माण झाली. ज्या महिला पुनर्वसनाच्या शासकीय प्रयत्नांमध्ये सहभागी होऊन व्यापक आर्थिक जगाच्या भाग झाल्या तसेच योगदान देणाऱ्या नागरिक म्हणून पुढे आल्या त्यांच्यासाठी कशा पद्धतीने फाळणी ही मुक्तीची संधी राहिली हे सुद्धा लेखिका अधोरेखित करतात.

‘Belonging’ या शेवटच्या प्रकरणात जीवनकथनांच्या आधारे, कुटुंब व जिवलग लोक गमावल्यानंतरही जिवंत राहिलेल्या स्त्रियांसंदर्भात अस्मितेचे राजकारण व नागरिकत्व याचा अभ्यास करतात. स्वतःच्या निर्णयांद्वारे किंवा घर व ‘कशाचा तरी भाग असण्याच्या’ धारणेतून कशा पद्धतीने स्वची संकल्पना निर्माण होते हे सुद्धा मेनन व भसीन या प्रकरणातून उलगडून दाखवतात.

प्रतिक्रिया आणि योगदानसंपादन करा

English Language Indian Press ने या पुस्तकाबद्दल सकारात्मक प्रतिक्रिया दिलेली आहे. इंडियन एक्स्प्रेस साठी लिहिताना अपर्णा बसू मांडतात, ‘पारंपारिक इतिहासतज्ञांनी दुर्लक्षिलेले व सोडून दिलेलं स्त्रियांचे आवाज व त्यांच्या जगण्याची गुणवत्ता पकडण्यात मेनन व भसीन यशस्वी झालेले आहेत.[१] न्यूज मेगजीन ‘Outlook’ ने या पुस्तकाला ‘पुनर्प्रप्ती ची कृती(an act of recovery)’ म्हणून मांडलेले आहे.[२] मानुषी या मासिकात पुनरावलोकनार्थी रिता मंचदा, स्त्रियांचे आवाज चित्रित करताना दाखवण्यात आलेली संवेदनशीलते साठी या पुस्तकाची प्रशंसा करतात.[३] उर्वशी बुटालिया व जर्मनीमध्ये आगभट्टीमध्ये जाळून ज्यू वंशीयांच्या केलेल्या हत्याकांडाच्या घटनेचे अभ्यासक यांच्या सोबतच भसीन व मेनन हे संघर्षाच्या अभ्यासात महत्त्वाचे मांडले गेलेले आहे. कारण त्यांनी अशा हिंसात्मक घटनांच्या वेळेस अनुभवास आलेल्या आठवणीचे जतन करण्याची गरज मांडलेली आहे.[४]

संदर्भ सूचीसंपादन करा