बेलोशी
बेलोशी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील एक गाव आहे.
?बेलोशी महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | पाचगणी |
जिल्हा | सातारा जिल्हा |
भाषा | मराठी |
बोलीभाषा | |
कोड • पिन कोड • आरटीओ कोड |
• 412805 • एमएच/११ |
भौगोलिक स्थान
संपादनबेलोशी हे सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील गाव आहे. ते पांचगणीपासून १० मिनिटाच्या अंतरावर, पांचगणी - पाचवड या मार्गावर आहे. बेलोशीच्या वरच्या बाजूला काटवली हे गाव आहे तर खालच्या बाजूला दापवड़ी हे गाव आहे. गावामधे जावळी सहकारी बँकेचे संस्थापक कै. ह. भ. प. दत्तात्रय महाराज कळंबे यांची समाधी आहे. काळ भैरवनाथ हे गावाचे ग्राम दैवत आहे.एप्रिल महिन्यामधे गावची यात्रा (दिंडी) असते
बाजूला काटवली आणि रूईघर ही गावे आहेत या गावांमधे ८० % बेलोशे आहेत तसेच खाली मेढ़ा भागात केळघर हे गाव आहे तिथे पण ८० % बेलोशे आहेत ही सगळी एकच भावकी
सातारा जिल्हा वगळता बेलोशे कुटुंब रत्नागिरी जिल्ह्यामधे खेड़ तालुक्यात ३ गावांमधे आहेत त्या पैकी नातूनगर हे १ गाव जे पोलादपुर पासून अवघ्या ३० मिनिटावर आहे तसेच रायगड जिल्ह्यामधे सुधागड़ तालुक्यात पण आहेत ते आडनाव लिहताना मात्र बेलोशे ऐवजी बेलोसे अस लावतात हे सगळे पूर्वीच्या काळात स्थाईक झालेले.
बेलोशीपासून काही मिनिटांच्या अंतरावर असलेली पर्यटन स्थळे :-
- पांचगणी - थंड हवेचे ठिकाण, फक्त १० मिनिटांच्या अंतरावर
- महाबळेश्वर - थंड हवेचे ठिकाण, फक्त ३० मिनिटांच्या अंतरावर
- वाई - महागणपती मदिर (दक्षिण काशी), फक्त ३० मिनिटांच्या अंतरावर
- प्रतापगड - छत्रपती शिवाजीराजे यांनी अफजलखानाचा वध याच ठिकाणी केला होता, फक्त ४५ मिनिटांच्या अंतरावर
- मांढरदेव - काळूबाई माता मंदिर, फक्त ९० मिनिटांच्या अंतरावर
- महु धरण परिसर फक्त ५ मिनिटांच्या अंतरावर
- पुस्तकांचे गाव "भिलार" ३० मिनिटांच्या अंतरावर
- बामणोली - तापोळा परिसर वासोटा किल्ला दर्शन ( बोटींग, कँम्पिंग, ट्रेकिंग) १ ते दिड तासाच्या अंतरावर
- लिंगमळा धबधबा ४५ मिनिटांच्या अंतरावर
हवामान
संपादनहा भाग डोंगराळ व वनाच्छादित असल्याने येथील हवामान थंड व आल्हाददायक आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीत नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांपासून वर्षातील सर्वाधिक पाऊस पडतो. येथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो. जून ते सप्टेंबर हा पावसाळा हंगाम असतो.एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो.