श्रीरामपूर तालुका

महाराष्ट्रातील तहसील, भारत
(बेलापूर (श्रीरामपूर तालुका) या पानावरून पुनर्निर्देशित)
हा लेख श्रीरामपूर तालुका विषयी आहे. श्रीरामपूर शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या


श्रीरामपूर
महाराष्ट्र राज्याच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर जिल्हा जिल्ह्याच्या नकाशावरील श्रीरामपूर दर्शविणारे स्थान

राज्य महाराष्ट्र, भारत ध्वज भारत
जिल्हा पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर जिल्हा
मुख्यालय श्रीरामपूर

क्षेत्रफळ ५६९ कि.मी.²
लोकसंख्या १,९८,२१८ (२०११)
लोकसंख्या घनता ४५०/किमी²
साक्षरता दर ८२.११%
लिंग गुणोत्तर ९६२ /

प्रमुख शहरे/खेडी बेलापूर, टाकळीभान
तहसीलदार श्री. प्रशांत पाटील
लोकसभा मतदारसंघ शिर्डी
विधानसभा मतदारसंघ श्रीरामपूर


भौगोलिक स्थान

संपादन

श्रीरामपूर हा अहमदनगर जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरील तालुका आहे. श्रीरामपूर तालुक्याच्या पूर्वेस नेवासा, पश्चिमेस राहता तर दक्षिणेस राहुरी तालुका आहे. उत्तरेला औरंगाबाद जिल्ह्याची हद्द आहे.

इतिहास

संपादन

हरेगाव - हे श्रीरामपूर तालुक्यातील एक प्रसिद्ध गाव असून या ठिकाणी ब्रॅन्डी कंपनीने 'बेलापूर शुगर इंडस्ट्रीज अलाइड लिमिटेड' नावाचा साखर कारखाना इ.स. १९१७ साली सुरू केला. हरेगाव येथे मत मौली आहे. कारखाना सुरू करण्यापूर्वी येथे गुळाचे उत्पादन घेतले जात होते असे. त्यानंतर या कंपनीने ब्रिटिश सरकारकडून भाडेपट्ट्यावर हजारो एकर जमीन घेतली व २२ एकर परिसरात हा कारखाना सुरू करण्यात आला. त्यावेळी साखर कारखान्यातील कामगार उसाच्या चिपाडांपासून बनवलेल्या खोपटांत राहत असत. त्या खोपट्यांना मोठी आग लागून सर्व झोपड्या जळून गेल्या. नंतर कारखाना व्यवस्थापन आणि प्रातिनिधिक युनियन यांनी मिळून उत्कृष्ट अशी कामगार वसाहत निर्माण केली. तिच्यात चांगली सांडपाण्याची व्यवस्था होती,. कामगारांसाठी एक दवाखाना होता व त्यांच्या मुलांसाठी शाळाही चालवली जात होती. खास बाब म्हणजे आज आपण जे दूध डेअरी प्रकल्प, कोंबडी पालन प्रकल्प पाहतो तसले प्रकल्प हरिगाव येथे कारखान्यामार्फत १९४० पासून चालू होते. कामगारांची एक सोसायटी होती आणि जीवनावश्यक वस्तूंचे एक दुकानही होते. मात्र पुढे सहकारी चळवळीमुळे या खाजगी कारखान्याचा अंत झाला. कारखान्याचे पहिले सर व्यवस्थापक लोकमान्य टिळकांचे नातू श्री. के के महाजन होते. आशिया खंडातील पहिला साखर कारखाना हरेगाव येथे स्थापन झाला होता. तसेच हरेगाव साखर कारखान्याव्यतिरिक्त आसपासच्या गावांमध्येसुद्धा अनेक कारखाने होते.

श्रीरामपूर येथील रामनवमीची यात्रा खूप प्रसिद्ध आहे.

श्री क्षेत्र सराला बेट - हे गोदावरीच्या कुशीत वसलेले असे एक नयनरम्य तीर्थक्षेत्र आहे. औरंगाबाद जिल्ह्याच्या सीमेवर असलेले बेट सराला हे भगवान शिवाचे फार प्राचीन असे तीर्थक्षेत्र आहे. या बेटामध्ये सदगुरू श्री गंगागिरीजी महाराज यांनी वास्तव्य केले व येथे सप्ताहाची परंपरा प्रारंभ केली. ती आजतागायत महंत रामगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली अखंड सुरू आहे.

दायमाबाद - पुरातत्त्वीय उत्खनन स्थळ

अशोकनगर,उक्कलगाव,उंदीरगाव,एकलहरे,ऐनतपूर

कडीत (खुर्द व बुद्रुक),कमालपूर,कान्हेगाव,कारेगाव

कुरणपूर,खानापूर,खिर्डी,खोकर,खंडाळा,गळनिंब

गुजरवाडी,गोंडेगाव,गोवर्धन,घुुुमनदेव,जाफराबाद

टाकळीभान,टिळकनगर,दत्तनगर,दिघी,नरसाळी,नाऊर

नायगाव,निपाणी वडगाव,निमगाव खैरी,पढेेेगाव

फत्याबाद,बेलापूर (खुर्द व बुद्रुक),ब्राम्हणगाव

भामाठाण,भेर्डापूर,भोकर,महांकाळ वडगाव,मातापूर

मातुलठाण,मांडवे,मालुंजा (खुर्द व बुद्रुक),

माळवडगाव,माळेवाडी,मुठेवडगाव,रांजणखोल,रामपूर

लाडगाव,वडाळा महादेव,वळद उंबरगाव,

वांगी (खुर्द व बुद्रुक),शिरसगाव,सराला बेट

हरेगाव

बाह्य दुवे

संपादन
  • "बेलापूर (श्रीरामपूर) तालुक्याचा नकाशा". ८ मार्च २०१८ रोजी पाहिले.

श्रीरामपूर जिल्हयातील गावे: उक्कलगाव, बेलापुर, हरेगाव, ममदापुर, गळनिंब, फत्याबाद, इ.