बुद्ध गाथा
भगवान बुद्धांच्या पवित्र मुखातून वेगवेगळ्या प्रसंगी सुखदायी गाथा,ज्या लहान परंतु अत्यंत गहन मनात खोल पर्यंत रुजणाऱ्या आहेत या काही गाथा ऐकून अनेक भिकू अरहंत पदाला पोहचले अशी अफाट शक्ती या गाथान मध्ये आहे.
अश्या पवित्र गाथा त्रिपिटक या ग्रंथात हजारो वर्ष जतन करण्यात आल्या आहेत पाली भाषेतील गाथा अनेक देश्यानी त्यांच्या भाषेत भाष्यातरित करून समग्र विकास साधला आहे. कम्बोडिया,श्रीलंका,थायलंड ब्रह्मदेश,व्हिएतनाम,लाओस असे अनेक लहान देश बौद्ध संस्कृती मुळे सांस्कृतिक दृष्ट्या खूप विशाल आहेत.
त्रिपिटक मराठी अनुवाद
संपादनतथागत बुद्धांच्या गाथा त्रिपिटीक पाली ग्रंथा मध्ये जतन करून ठेवल्या आहेत त्या पैकी काही गाथांचे मराठीत अनुवाद खालील प्रमाणे आहे.
दिघ निकया
संपादनमज्झिम निकाय
संपादनसंयुत्त निकाय
संपादन१३. अभिषमामय-संयुत्त - साकार
संपादनसूत्र १३. ०१
नाखासिखा सुत्त : बोटाची नख सूत्र
मी ऐकले की एके काळी भगवान बुद्ध श्रावस्ती मध्ये अनाथपिंडिकाच्या विहार जेतवनात राहत होते, मग भगवंतांनी आपल्या बोटाच्या नखा भोवती थोडीशी धूळ उधळली आणि ते भिक्षुना म्हणाले, “तुम्हा काय वाटते, भिक्षु? काय मोठे आहे: मी माझ्या नखांनी थोडेसे धूळ उचलली आहे कि महान पृथ्वी? "
"भगवान, विशाल पृथ्वी ही खूप मोठी आहे. भगवान आपल्या नखच्या टोकावर असलेली धूळ या विशाल पुर्थ्वी समोर काहीच नाही. शंभरावा ,एक हजारावा , शंभर-हजाराइतका ही नाही - या धुळीची या महान पृथ्वीशी तुलना केली असता धूळ काहीच नाही.
"त्याच प्रकारे, भिक्षू, जे दृढनिश्चयी आहेत अशा थोर शिष्यासाठी, ज्यांनी सर्व आसवे मोडून टाकलीत दुःख आणि वेदना संपूर्णपणे संपविल्या आहेत ज्याचा राग अग्नी पूर्णपणे विजला आहे. ती स्थिती खूप विशाल आहे जेव्हा मागील सात लोकांच्या तुलनेत ती शंभर, एक हजारवी, शंभर हजारांची नसते.जेव्हा आपण गत दुःखाचा विचार करतो.या प्रमाणे धम्माच्या मार्गावर चालण्याचे फायदे असतात,या प्रमाणे भिकू धम्म नेत्र मिळण्याचे फायदे असतात. "
अंगुत्तर निकाय
संपादनखुद्दका निकाय (‘लघु संग्रह’)
संपादनखुद्दका निकाय (‘लघु संग्रह’) सुत्त पिटकामध्ये पाच निकयांपैकी शेवटचा संग्रह आहे, जो थेरवाद बौद्ध धर्माच्या पाली तिपिटाकांची रचना करणाऱ्या “तीन पिटका” पैकी एक आहे. या निकयामध्ये पंधरा (थायलंड), पंधरा (श्रीलंका बुद्धघोष यांच्या यादीतील ) किंवा अठरा पुस्तके (ब्रह्मदेश), बुद्ध आणि त्याच्या मुख्य शिष्यां संबधित विविध विषयांवर वेगवेगळ्या आवृत्तींमध्ये उपलब्ध आहेत.
१. खुद्दकपद - नऊ लहान परिच्छेदांचा संग्रह जो नव प्रव्रर्जित भिक्षू आणि भिक्षुणींसाठी धर्मशिक्षणाचे पहिली नियमावली होय. यामध्ये अत्यंत महत्त्वाच्या गाथा आहे ज्या आजही थेरवाद बौद्ध धर्माच्या जगभरातील विहारात रोज पठण केल्या जातात. या परिच्छेदांमध्ये समाविष्ट आहे: त्रिरत्नाला शरण जाण्याचे सूत्र; दहा आज्ञा; आणि करणीय मैत्री गाथा, मंगल गाथा आणि रतन सुत्त.
- शरण गमना - बुद्धं शरणं गच्छामि : मी बुद्धाला शरण जातो। धम्मं शरणं गच्छामि : मी धम्मला शरण जातो। संघं शरणं गच्छामि : मी संघाला शरण जातो।
- दुतियम्पि बुद्धं शरणं गच्छामि : दुसऱ्यांदा मी बुद्धाला शरण जातो। दुतियम्पि धम्मं शरणं गच्छामि :दुसऱ्यांदा मी धम्मला शरण जातो। दुतियम्पि संघं शरणं गच्छामि : दुसऱ्यांदा मी संघाला शरण जातो।
- ततियम्पि बुद्धं शरणं गच्छामि : तिसऱ्यांदा मी बुद्धाला शरण जातो। ततियम्पि धम्मं शरणं गच्छामि :तिसऱ्यांदा मी धम्मला शरण जातो। ततियम्पि संघं शरणं गच्छामि : तिसऱ्यांदा मी संघाला शरण जातो।
- दस्स सिक्खपदा - १. मी चोरी करणार नाही २. मी खोटे बोलणार नाही ३. मी व्याभिचार करणार नाही. ४. मी खोटे बोलणार नाही. ५. मी दारू पिणार नाही. ६. मी अवेळी अन्न ग्रहण करणार नाही ७. मी नृत्य, गाणे, संगीत आणि पाहणे आदी पासून दूर राहील ८. मी हार घालणे सुगंध व सौंदर्यप्रसाधनांनी सुशोभित अश्या वस्तूपासून दूर राहील. ९. मी उच्च आणि विलासी पलंग आदी वर झोपणार नाही १०. मी सोने आणि चांदी आदींचे दान ग्रहण करणार नाही.
२. धम्मपद -
संपादन- यमकवग्गो
१. मनोपुब्बङ्गमा धम्मा, मनोसेट्ठा मनोमया। मनसाचे पदुट्ठेन, भासति वा करोति वा। ततो नं दुक्खमन्वेति, चक्कंव वहतो पदं॥
१. मन हे सर्व धर्माच्या (प्रवृत्तीच्या) पुढे आहे,मन हे प्रधान श्रेष्ठ आहे;ते धर्म मनोमयच आहेत. जर कोणी प्रदुष्ट मनाने बोलतो किंवा वागतो,तर वाहन ओढणाऱ्या [बैलाच्या] पावालामागे जसे चाक लागते तसे दुःख त्याच्या मागे लागते.
२. मनोपुब्बंगमा धम्मा मनोसेट्टा मनोमया । मनसाचे पसन्नेन भासलत वा करोलत वा । ततो नं सुखमनवेलत छाया व अनपालयनी ।। २ ।।
२. मन सर्व धर्मात (प्रवृत्तीमध्ये) पुढे आहे,सर्व विषय मना पासून उत्पन्न होतात जर कोणी पवित्र, चांगल्या मनाने बोलतो किंवा वागतो,तर सोडून न जाणाऱ्या छायेप्रमाणे सुख त्याच्या मागोमाग फिरते
३. अक्कोण्च्छ मं अवलध मं अलजलन मं अहालस मे । ये तं उपनय्हण्नत वेरं तेसं न सम्मलत ।। ३ ।।
३. मला शिव्या दिल्या, मला मारले,मला हरवले,मला लुटले याची जे मनात गाठ बांधतात, त्यांचे वैर शांत होत नाही.
४. अक्कोण्च्छ मं अवलध मं अलजलन मं अहालस मे । ये तं न उपनय्हण्नत वेरं तेसूपसम्मलत ।। ४ ।।
४. मला शिव्या दिल्या, मला मारले,मला हरवले,मला लुटले याची जे मनात गाठ बांधीत नाहीत, त्यांचे वैर शांत होते.
५. न लह वेरेन वेरालन सम्मनतीध कुदाचनं । अवेरेनच सम्मण्नत एस धम्मो सननतनो ।। ५ ।।
५. या जगात वैराने वैर शांत होत नाही, अवैरानेच संपतो,हा शाश्वत नियम आहे.
६. परेच न लवजानण्नत मयमेत्थ यमामसे येच तत्थ लवजानण्नत ततो सम्मण्नत मेधगा ।। ६ ।।
६. असे आहेत ज्यांना हे समजत नाही की, आपण हया संसारातून जाणार आहोत आणि हे जे जाणतात त्यांचे कलह शमन पावतात.
७. सुभानुपस्स्स लवहरनतं इण्नद्रयेसु असंवुतं । भोजनण्म्ह अमत्तञ्ञ्ुकुसीतं हीनवीलरयं । तं वे पसहलत मारो वातो रुक्खं व दुब्बिं ।। ७ ।।
७. देह शुभ लेखुनी वर्ततो, इंद्रिय सुखात रत राहतो, भोजनात मर्यादा राखत नाही,जो सुस्त आणि आळशी असतो, त्याचा मारा पाडाव करतो, ज्या प्रमाणे वारा दुर्बळ झाड पाडून टाकतो
८. असुभानुपस्सिं विहरन्तं, इन्द्रियेसु सुसंवुतं। भोजनम्हिच मत्तञ्ञुं, सद्धं आरद्धवीरियं। तं वे नप्पसहति मारो, वातो सेलंव पब्बतं॥
८. देह अशुभ लेखुनी वर्ततो, इंद्रिय सुखात रत राहत नाही, भोजनात मात्रा राखतो,जो श्रद्धावान आणि उद्योगी असतो, त्याचा मारा हलवू शकत नाही ,ज्या प्रमाणे शिलामय पर्वताला वारा.
९. अनिक्कसावो कासावं, यो वत्थं परिदहिस्सति। अपेतो दमसच्चेन, न सो कासावमरहति॥
९. ज्याने चित्त मलाचा अजून परित्याग केला नाही, परंतु काश्याय वस्त्र धारण केले आहे. जो संयम आणि सत्या पासून दूर आहे त्याने जरी काषाय वस्त्र परिधान केले, तरी तो त्या काषाय वस्त्राला पात्र नाही
१०. योच वन्तकसावस्स, सीलेसु सुसमाहितो। उपेतो दमसच्चेन,स वे कासावमरहति॥
१०. ज्याने चित्त मलाचा परित्याग केला आहे, जो शीलवान आहे जो संयम आणि सत्याच्या जवळ आहे तोच काषाय वस्त्राला पात्र आहे
११. असारे सारमतिनो, सारे चासारदस्सिनो। ते सारं नाधिगच्छन्ति, मिच्छासङ्कप्पगोचरा॥
११. जो (अधम्माला) निःसारला सार आणि (धम्माला)सारला निःसार समजतो,अश्या चुकीच्या चिंतनात लागलेल्या व्यक्तीस साराची प्राप्ती होत नाही.
१२. सारञ्च सारतो ञत्वा, असारञ्च असारतो। ते सारं अधिगच्छन्ति, सम्मासङ्कप्पगोचरा॥
१२. जो (धम्माला) सारला सार आणि (अधम्माला) निःसारला निःसार समजतो,जे सम्यक संकल्पात वावरतात ते सार मिळवतात
१३. यथा अगारं दुच्छन्नं, वुट्ठी समतिविज्झति। एवं अभावितं चित्तं, रागो समतिविज्झति॥
१३.ज्याप्रमाणे (अव्यवस्थित)पद्धतीने साकारलेल्या (आच्छादलेल्या) घरात पावसाचे पाणी घुसते, त्याचप्रमाणे राग काम ध्यान साधनेने संस्कारित न झालेल्या चित्तात घुसते
- अप्पमादवग्गो
२१. अप्पमादो अमतपदं पमादो मच्चुनो पदं ।
अप्पमत्ता न मीयण्नत ये पमत्ता यथा मता ।। १ ।।
२१. अप्रमाद म्हणजे जागृत असणे हा अमृताचा (अमरत्वाचा) मार्ग आहे;
प्रमाद म्हणजे बेसावधपणा हा मृत्युचा मार्ग आहे. जे अप्रमत्त आहेत ते मरत नाहीत;
जे प्रमत्त आहेत ते मृतवतच (जणू काय मृतच) आहेत.।। १ ।।
- चित्तवग्गो
३३. फदनं चपलं चित्तं दुरक्खं दुणीवारयंम ।
उजुंम करोती मेधावी उसुकारो व तेजनंम ।। १ ।।
३३. थरथरणारे वा डगमगणारे,रक्षण करन्यास कठीण,
ज्यावर ताबा ठेवणे कठीण अश्या चित्ताला ज्ञानी पुरुष सरळ करतात
जसा बाण बनवणारा (कारागीर) बाणास (सरळ करतो).।। १ ।।
३. उदाना
संपादन४. इतिवुत्तका
संपादन५. सुत्त निपता
संपादन१. उरगवग्गा - साप अध्याय
संपादन२. कुलावग्गा - कमी अध्याय
संपादन३. महावग्गा - महान अध्याय
संपादन३.१. पब्बाजा सुत्त : परिव्रजा सूत्र
मी आपल्याला सांगू इच्छितो भगवंतांनी परिव्रजा का घेतली
ते कश्याप्रकारे, सम्यक दुर्ष्टी असलेले परीव्रजित झाले
कुठल्या कारणामुळे त्याने परिव्रजेचा मार्ग स्वीकारला
"घरगुती जीवनात गर्दी असते,धुळीचे क्षेत्र,स्वास गुदमरतो
परिव्रजेचा मार्गावर मुक्तपने श्वास घेतला जातो मोकळ्या हवेत,
हे पाहून ते मुक्तीच्या मार्गवर रूढ झाला.
परिव्रजित झाल्यावर
त्यांनी शारीरिक दुष्कृत्ये टाळली.
तोंडी (वाचिक) गैरवर्तन सोडून
जीवनचरिथार्थ सरळ मार्गे सुरू केला
मग ते राजगृह येथे गेले
मगध येथील नगरीत
तेथे भिक्शासाठी भ्रमण केले
ज्याचा शरीरावर बुद्धत्वाचा स्पष्ट खुणा होत्या
जे प्रमुख गुणांसह संपन्न होते
महाराज बिंबिसाराने राजवाड्यात उभे राहून त्यांना पाहिले,
त्याच्या शरीरावरील बुद्धत्वाच्या स्पष्ट खुणा पाहताच
म्हणाले “ हे पाहा.राजदूतांनो किती देखणा, सभ्य, शुद्ध!
त्यांचे आचरण किती पवित्र आहे! तो जागृत आहे
त्याचे डोळे झुकलेले आहेत, पायाच्या बोटांसमोरील
काहीस गज अंतर पाहत आहे, शीलवान चालत आहे
आपण राजकीय दूत पाठवा
भिक्षू कोठे जातोय हे पाहण्यासाठी. "
दूत निघाले "हा भिक्षू कुठे जाईल?
त्याचे निवासस्थान कोठे असेल? "
हे पाहण्यासाठी तो भिक्षासाठी घरोघरी जात असताना -
स्वतःला सयमित ठेवत चालला होता,
त्याच्या भावनांवर पहारा देत,
सावध, सतर्क
त्याचे भिक्षापात्र लवकरच भरले
म त्या भिक्षु ने नगर सोडून पाडवापर्वताकडे
मार्गक्रमण केले "तिथेच त्याचे विहारस्थान असेल."
त्याला आपल्या विहारस्थानाकडे जाताना पाहून
तीन दूत तिथेच बसले आणि एक राजमहलाकडे
बातमी घेऊन निघाला.
महाराज तो भिकू पांडव कड्यावर
विशाल वाघासारखा,शक्तिशाली शिहासारखा
डोंगर कड्यात बसला आहे.
राजदूताचे ते शब्द ऐकून
थोर योद्धा राजा सरळ शाही रथाने
थेठ पाडवापर्वता जवळ गेले
शाहीरथ पर्वताच्या आत जेवढा जाईल
तेवढा आत पोहचल्यावर रथा खाली उतरून
चालत ते भिकू जवळ पोहोचले
जवळ पोहोचल्यावर ते बसले व
विनम्र अभिवादन करत म्हणाले:
"आपण तरुण आहात ,तारुण्याच्या पहिल्या टप्प्यात आहात
उंच आणि सुंदर आहेस सैन्याच्या वस्त्रात हत्ती पथकासह सज्ज.
आपण रूबाबदार दिसाल
मी तुम्हाला संपत्ती देऊ इच्छितो आपण आनंद घ्या.
मी तुमच्या परिजनांबद्दल विचारतो मला आपल्या बद्दल सांगा.
महाराज "सरळ पुढे, हिमालयातील पायथ्याशी,
माझा कोसल देश आहे जो श्रीमंत आणि शक्तिशाली आहे
आहे जे सूर्यवंशी आहेत जन्मता शाक्य आहेत
त्या वंशातून मी परिव्रजा धारण केली आहे.
लैंगिक सुखांच्या शोधात नाही.
कामुक सुखा मध्ये धोका पाहून
त्यागात माझ्या मनाला शांती लाभते
तिथेच माझे हृदय आनंदित होते. "
६. विमानवत्थु
संपादन७. पेटावत्थु
संपादन८. थेरागाथा :वयस्क भिक्षूंची गाथा
संपादनअध्याय ०१-
अध्याय ०२-
अध्याय ०३-
अध्याय ०४-
अध्याय ०५-
अध्याय ०६-
अध्याय ०७-
अध्याय ०८-
अध्याय ०९-
अध्याय १०-
अध्याय ११-
अध्याय १२-
अध्याय १३-
अध्याय १४-
अध्याय १५-
अध्याय १६-
अध्याय १७-
अध्याय १८-
अध्याय 19 - पन्नास आवृत्तीचे गट तलापुता थेर :एक भिक्षु स्वतःला सल्ला देताना.
१. परिव्रजेच्या अगोदरचे विचार
१. कधी,हो कधी मी एकटाच राहणार
पर्वतांमधील लेणी मध्ये, तृष्णा नसलेल्या मनाने
जे काही उत्पन्न होत आहे ते अस्थिर आहे हे
स्पष्ट दृष्टीने पाहत, माझी ही इच्छा,केव्हा पूर्ण होईल?
२. केव्हा मी फाटक्या चिंध्या पासून तयार झालेले
काश्याय वस्त्र परिधान करेल. श्रमण,वासनेतून मुक्त
लोभ,राग आणि भ्रम समूळ उपटून टाकलेले
घनदाट जंगलात जाऊन, खरोखर शांत होईल?
३. मी हे शरीर केव्हा स्पष्ट बघणार -
नाशवंत आणि आजाराचे अस्थिर घरटे
मुर्त्यू आणि म्हातारपणाने ग्रासलेले, भीतीपासून मुक्त राहून
एकटा जंगलात फिरू शकेल का ? खरंच कधी होईल?