बुद्धानुसत्ती म्हणजे गौतम [बुद्ध]]ांप्रती सन्मान. त्यांनी सांगितलेल्या नीतीचा, सदाचाराचा जीवनात उपयोग करणे. मानवी इतिहासात गौतम बुद्ध हे शिक्षक होते.[]

भारताच्या बिहार राज्यातल्या गया येथील बुद्धाचा पुतळा

वंदना

संपादन
बुद्ध वन्दना (पाली)
इति पि सो भगवा अरहं, सम्मालम्बुद्धो,
विज्जाचरणसम्पन्नो,
सुगतो,
लोकविदू,
अनुत्तरो, पुरिसदम्म सारथि,
सत्था देव-मनुस्सानं,
बुद्धो
भगवा ति

बुद्ध वंदन (मराठी अर्थ)
अर्हत, सम्यक् संबुद्ध,
विद्येनुरूप आचारणाने संपन्न,
सुगती निर्वाण प्राप्त केलेले,
लोक-लोकांतराचे रहस्य जाणणारे,
सर्वश्रेष्ठ, दमनशील पुरुषांचे सारथी,
देव आणि मनुष्यांना सुमार्गावर नेणारे
असे भगवान बुद्ध आहेत.

सराव पद्धती

संपादन

जेव्हा बौद्ध उपासक-उपासिका बुद्धपूजा करतात त्यावेळी ते केवळ सर्वश्रेष्ठ अशा बुद्धाचीच पूजा व आदर करतात. आपला आत्मविश्वास (?) बुद्धांप्रती वृद्धिंगत करतात. उपासक-उपासिकांनी त्याचवेळी कृतज्ञतापूर्वक संकल्प करावा व त्यांनी दिलेल्या वा सांगितलेल्या शिकवणुकीनुसार स्वतःला प्रज्ञावान करण्यासाठी आचरण करावे आणि इतरांनाही आपली सेवा/मदत मिळेल असे प्रयत्न करावेत.

हे सुद्धा पहा

संपादन

संदर्भ

संपादन
  • संदर्भग्रंथ — बुद्धिझम फॉर यंग स्टूडन्स, (पृ. ३५) लेखक - भंते डॉ. सी. फॅंगचॅंम (थायलंड)