बी आय एस हॉलमार्क ही मौल्यवान धातूंची शुद्धता प्रमाणित करणारी प्रणाली आहे.[]भारत ही जगातील सोने आणि सोन्याच्या दागिन्यांची दुसऱ्या क्रमांकाची बाजारपेठ आहे. भारतात विकल्या जाणाऱ्या सोने आणि चांदीच्या दागीन्यांच्यासाठी बी आय एस हॉलमार्क ही धातूची शुद्धता प्रमाणित करणारी प्रणाली आहे. भारतीय मानक ब्युरोने घालून दिलेल्या निर्देशांनुसार दागिन्यांमधील धातूची शुद्धता प्रमाणित केली जाते.

भारतात सोने दागिन्यांसाठी हॉलमार्क प्रणाली एप्रिल २००० मध्ये अस्तित्वात आली. या प्रणालीत पुढील प्रमाणांचा आधार आहे

  • IS 1417( सोने आणि सोन्याचे मिश्र धातूंपासून बनवलेले दागिने आणि वस्तू यांचे वर्ग)
  • IS 1418(सोने बुलियन, सोन्याचे मिश्र धातू, दागिने आणि वस्तू यांच्या शुद्धतेची तपासणी)
  • IS 2790 (२३,२२,२१,२०,१९,१७,१६,१४ आणि ९ कॅरेटचे सोन्याच्या मिश्र धातूच्या उत्पादनाची मार्गदर्शक तत्त्वे)
  • IS 3095 (सोने दागिना बनवताना वापरले जाणारे जोड धातू)

बी आय एस हॉलमार्क

संपादन

सोने दागीन्यांच्यासाठी असलेल्या हॉलमार्क प्रणाली मध्ये पुढील गोष्टी अंतर्भूत आहेत.

  • बी आय एसचे चिन्ह (लोगो)
  • सोन्याची शुद्धता - २२ कॅरेट साठी 22K916, १८ कॅरेट साठी 18K750, १४ कॅरेट साठी 14K585
  • शुद्धता तपासणी केंद्राचे चिन्ह
  • सोनाराचे/ व्यावसायिकाचे चिन्ह

चांदी

संपादन

भारत मानक ब्युरोने चांदीच्या दागिन्यांच्या साठी IS 2112 प्रमाणाप्रमाणे शुद्धता प्रणाली २००५ पासून कार्यान्वित केली आहे.

शुद्धता तपासणी आणि हॉलमार्क करणारी केंद्रे

संपादन

दागिन्यांच्या शुद्धतेची तपासणी आणि त्यावर उमटवली जाणारी मोहोर ही त्याकरिता नियुक्त केलेल्या केंद्रांवरच होऊ शकते. ही खाजगी केंद्रे ही बीस प्रमाणित आहेत आणि ती बी आय एसच्या निर्देशांच्या नुसार काम करतात.

कायदेशीर तरतूद

संपादन

हॉलमार्क केलेलेच दागिने विकणे हे भारतात दि १५ जानेवारी २०२१ पासून बंधनकारक आहे. [] हॉलमार्क हे ग्राहक हिताचे असल्यामुळे ग्राहकांची याला पसंती आहे.

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ "Bureau of Indian Standards- Hallmrking Press Release". web.archive.org. रोजी मूळ पानापासून संग्रहित2012-05-11. 2020-03-23 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
  2. ^ "Hallmarking of gold made mandatory". The Hindu (इंग्रजी भाषेत). Special Correspondent. 2012-01-04. ISSN 0971-751X. 2020-03-23 रोजी पाहिले.CS1 maint: others (link)