बी अँड एच एरलाइन्स

(बी अँड एच एरलाईन्स या पानावरून पुनर्निर्देशित)

बी ॲन्ड एच एरलाइन्स (बॉस्नियन: B&H Airlines) ही बॉस्निया आणि हर्झगोव्हिना देशाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. १९९४ साली एर बोस्ना नावाने स्थापन झालेली ही कंपनी २००३ साली दिवाळखोरीमध्ये निघाली. २००५ साली बॉस्निया आणि हर्झगोव्हिना सरकारने २००५ साली कंपनीची पुनर्रचना करून बी ॲन्ड एच एरलाइन्स ही नवी कंपनी निर्माण केली.

बी ॲन्ड एच एरलाइन्स
आय.ए.टी.ए.
JA
आय.सी.ए.ओ.
BON
कॉलसाईन
AIR BOSNA
स्थापना १९९४ (एर बोस्ना नावाने)
हब सारायेव्हो आंतरराष्ट्रीय विमानतळ
मुख्य शहरे बंजा लुका
विमान संख्या
मुख्यालय सारायेव्हो, बॉस्निया आणि हर्झगोव्हिना
संकेतस्थळ http://www.bhairlines.ba/
बी ॲन्ड एच एरलाइन्सचे भूतपूर्व बोईंग ७३७ विमान

बी ॲन्ड एच एरलाइन्सचे मुख्यालय सारायेव्हो येथे असून सारायेव्होच्या सारायेव्हो आंतरराष्ट्रीय विमानतळावर तिचा प्रमुख वाहतूकतळ आहे. सध्या ह्या कंपनीकडे केवळ २ ए.टी.आर. ७२ बनावटीची विमाने आहेत व ती सारायेव्हो, बंजा लुका, कोपनहेगनझूरिच ह्या चार शहरांना विमानसेवा पुरवते.

बाह्य दुवेसंपादन करा