बोम्मीरेड्डी नागी रेड्डी

भारतीय चित्रपट दिग्दर्शक
(बी.एन. रेड्डी या पानावरून पुनर्निर्देशित)

बी. नागी रेड्डी तथा बोम्मीरेड्डी नागी रेड्डी (तेलुगू:బొమ్మిరెడ్డి నాగిరెడ్డి) (डिसेंबर २, इ.स. १९१२ - फेब्रुवारी २५, इ.स. २००४[१]) हा तेलुगू चित्रपट निर्माता होता.

मूळ आंध्र प्रदेश राज्यातील कडप्पा जिल्ह्यातील पोट्टीपडू गावातील नागीरेड्डीने चेन्नाईमध्ये विजय वाहिनी स्टुडियो स्थापून चित्रपटनिर्माण सुरू केले. हा स्टुडियो नंतर आशियातील सगळ्या मोठा स्टुडियो झाला.[२]

नागीरेड्डीने पाताळ भैरवी (१९५१), मिस्साम्मा (१९५५), माया बझार (१९५७), गुंडम्मा कथा (१९६२), राम और श्याम, श्रीमान श्रीमती, जुली (१९७५), स्वर्ग नरक (१९७८) असे अनेक चित्रपट निर्मिले.

संदर्भ आणि नोंदी संपादन

  1. ^ "TTD condoles B. Nagi Reddy". The Hindu. Chennai, India. 2004-02-27. Archived from the original on 2004-09-18. 2007-04-17 रोजी पाहिले.
  2. ^ "B.Nagi Reddy dead". 2004-02-26. 2004-02-26 रोजी पाहिले.