बिसाऊ पॅलेस हॉटेल, जयपूर
बिसाऊ पॅलेस हॉटेल, जयपूर हे भारतातील जयपूर शहरातील एक हॉटेल आहे. हे हॉटेल रघुबीर सिंघजी या अमीर व्यक्तीने १९व्या शतकात बांधलेल्या राजवाड्यात उघडले गेले आहे. हा राजवाडा येथील अैतिहासिक वारसा सांगणाऱ्या इमारतींपैकी एक आहे.
ठिकाण
संपादनहे हॉटेल जयपूरच्या जुन्या शहरभागातील चंद पोल हनुमान मंदिरापासून अर्ध्या किलोमीटरवर आणि जरहण मशिदीपासून एक किलोमीटरवर जयपूर शहराच्या प्रवेशद्वाराच्या भिंतीबाहेर आहे. हे शहराच्या ईशान्य दिशेस शहरापासून एक किलोमीटरवर आहे. [१]जयपूरमधील इतर प्रेक्षणीय ठिकाणांपासून, म्हणजे जंतर मंतर, जल महाल, हवा महाल, जयपूर आंतरराष्ट्रीय विमानतळ आदींपासून हे हॉटेल १३ किलोमीटरवर आणि जयपूर रेल्वे स्टेशनपासून ४ किमी. अंतरावर आहे.[२]
इतिहास
संपादनमहाराजा सवाई जगतसिंघ या राजाने सन १८०३ ते १८१८ या दरम्यान हा राजवाडा बांधला. [३]मूलतः याची रचना महकुलीन रघुबीर सिंघजी यांची होती. शेखावती मिळकत बिसाऊ घराण्याची होती.[३] हा राजवाडा सन १९७७मध्ये हॉटेलमध्ये परिवर्तित केला गेला. सध्या हे हॉटेल जयपूरच्या जुन्या बाजार विभागात आहे.[३]
वास्तुशिल्प आणि अन्य गोष्टी
संपादनहॉटेलचे मुख्य प्रवेशद्वार वक्राकार आहे. प्रवेशद्वारातील रंगीबेरंगी लाद्या नयनरम्य व नमुनेदार दिसतात. जमिनीवरील लाकडी फर्निचर आरामात पडून राहाण्याचा आनंद देईल अशी खात्री देते. [४]या हॉटेलमध्ये ३६ खोल्या आहेत. त्यातील कांहींमध्ये अद्वितीय शयनसाहित्य असून, प्रसाधनगृहदेखील साफसुथरे आणि प्राचीन कलाकुसर युक्त आहे. या राजवाड्यातील दरबारात महाराजा बिसाऊंचे रंगचित्र लटकावलेले आहे.[४] शिवाय हाताघाईचया लढाईसाठी वापरल्या जाणाऱ्या तलवारी राजवाड्याच्या भिंतीवर टांगलेल्या आहेत. बैठक खोलीचच्या पुढील बाजूस लाकडी तावदानात जुन्या पुस्तकांचे भरगच्च संग्रहालय आहे. शिवाय नमुनेदार कारागिरी केलेल्या एका प्रेक्षणीय दिमाखदार फडताळात जडजवाहर, हत्यारे, दगडावर घडविलेले हत्ती, फुलदाणी, फोटो, त्यात वाघाची शिकार देखावा, बिसाऊ कुटुंबाशी झालेली लॉर्ड माऊंटबॅटन यांची भेट यांचा समावेश आहे. [४] या हॉटेलमध्ये तीन उपहारगृहे आहेत. त्यांतले एक गच्चीवर आहे. तेथे रात्री भोजनसमयी राजस्थानी लोकनृत्याचे कार्यक्रम होतात.
संदर्भ
संपादन- ^ "विथ द कामसूत्र अंडर माय आर्म : माय मॅडकॅप मिसॲडव्हेन्चर्स ॲक्रॉस इंडिया" (इंग्लिश भाषेत). १९-०४-२०१६ रोजी पाहिले.
|अॅक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link) - ^ "बिसाऊ पॅलेस हॉटेल जयपूर ,ठिकाण" (इंग्लिश भाषेत). १९-०४-२०१६ रोजी पाहिले.
|अॅक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link) - ^ a b c "लॅन्ड अँड पीपल ऑफ इंडियन स्टेट्स अँड युनिअन टेरिटरीज इन ३६ व्हॉल्यूम्स-राजस्थान" (इंग्लिश भाषेत). १९-०४-२०१६ रोजी पाहिले.
|अॅक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link) - ^ a b c "द ग्रैंड न्यू दिल्ली एस्केपेड" (इंग्लिश भाषेत). १९-०४-२०१६ रोजी पाहिले.
|अॅक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)