बिमान बोस
बिमान बोस हे एक भारतीय राजकारणी आहेत. ते पूर्वीचे भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी)चे पश्चिम बंगाल शाखेचे अध्यक्ष होते.[१] नंतर त्यांची जागा त्याचा मदतनीस सूर्य कांत मिश्रा ह्याने घेतली, तरी बिमान हे पक्षाच्या कार्यकारी समितीमध्ये राहिले.[२][३][४]
बिमान बोस | |
---|---|
जन्म |
१ जुलै, १९४० कलकत्ता, बंगाल, ब्रिटिश भारत |
निवासस्थान | कोलकाता |
राजकीय पक्ष | भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) |
जीवन
संपादनबिमान बोस हे कोलकाता विद्यापीठाच्या मौलाना आझाद विद्यालयाचे विद्यार्थी आहेत. त्यांनी शालेय जीवनापासूनच राजनैतिक व सामाजिक चळवळीत भाग घ्यायला सुरुवात केली. ते शाळेत असतांनाच सन १९५४ मधल्या एका पोट-निवडणुकीच्या मोहिमेत सहभागी झाले.. त्याला पक्षामध्ये सामील करण्याची शिफारस जरी १९५७ रोजी करण्यात आली, तरी तो पक्षात १९५८ रोजी सामील झाला, कारण किमान वय मर्यादा १८ ही होती. त्यांनी १९५६मध्ये बंगाल - बिहार एकत्रीकरणाविरुद्धच्या चळवळीत व १९५९ रोजी अन्न चळवळीत भाग घेतला. त्यांना १९५८ साली तुरुंगवास झाला.[५] १९६४ रोजी बोस हे कलकत्ता जिल्ह्यातील बंगाल प्रांतिक विद्यार्थी फेडेरेशनचे सचिव, व पुढे त्याच संघटनेचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. त्यांनी १९६० दशकात इंडो-व्हिएतनाम एकता समितीचे सहाय्यक सचिव म्हणून काम केले. १९७१ साली ते भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी)च्या पश्चिम बंगाल राज्य समितीचे सदस्य झाले व १९७८ साली सचिवालय सदस्य झाले. पक्षाच्या केंद्रीय समितीमध्ये ते १९८५ साली, तर कार्यकारी समितीमध्ये १९९८ साली निवडून आले.[६]
वादंगे
संपादनबोस हे अनेक वादांच्या केंद्रभागी राहिले आहे.चे पूर्व लोकसभा सदस्य अनिल बसू ह्यांना भ्रष्टाचाराच्या आधारावर पक्षाबाहेर काढल्यावर, त्यांच्या पत्नीने बोस ह्यांना बदनामी गुन्हा दाखल करणार अशी धमकी दिली. [७][८]
२०१३ मध्ये बंगालच्या प्रसिद्ध दैनिक 'आनंदबाजार पत्रिका' ह्यामध्ये सी. पी. आय. एम.च्या अनेक सदस्यांचे नाव, ज्या राजकारण्यांच्या बँक खात्यात १६ करोड रुपये आहेत, त्यामध्ये जाहीर झाले. त्यात बोस ह्यांचे नाव होते. बोस ह्यांच्यावर टीका करत पशसम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी बोलल्या कि पूर्ण वेळ पक्षाचा कार्यकर्ता असतांना ही १६ करोड रुपये कुठून येतात. त्यावर, हे १६ करोड तुपाये पक्षाचे निवडणूक निधी आहेत, व ती आमच्या खात्यात जमा केले हे आमच्या कडून चूक झाली, असे बोलत बोस ह्यांच्या आरोप नाकारले.[९]
२०१० रोजी बोस ह्यांनी सोमनाथ चॅटर्जी ह्यांचे पूर्व माकप अध्यक्ष प्रकाश करत ह्यांच्यावरील टीका 'कचरा' आहेत असे सांगितले. व त्यांने ज्योती बसु ह्यांचा नाव वादंगामध्ये घेतल्या मुळे सुद्धा बोस ह्यांनी चॅटर्जींवर टीका केली.[१०]
संदर्भ
संपादन- ^ "Surya Kanta Mishra replaces Biman Bose as CPI(M) Bengal unit secretary".
- ^ "CPM politburo meet on poll debacle on". 2011-08-11 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-11-24 रोजी पाहिले.
- ^ "National : Biman Bose will stay: Jyoti Basu". 2012-11-06 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-11-24 रोजी पाहिले.
- ^ "The Telegraph - Calcutta (Kolkata) | Bengal | New faces crowd Left Front civic poll list".
- ^ "Com. BIMAN BASU". 2016-03-03 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-11-24 रोजी पाहिले.
- ^ "Com. BIMAN BASU". 2016-03-03 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-11-24 रोजी पाहिले.
- ^ "Suspended CPI(M) MP's wife threatens suit against Biman Bose".
- ^ "West Bengal CPIM in trouble as ex MP's wife threatens to sue Biman Bose".
- ^ "Rs 16 Cr in bank row lands Bengal CPIM veterans in soup".
- ^ "Somnath's comments were rubbish".[permanent dead link]