बिट्वीन डेमॉक्रसी अँड नेशन : जेंडर अँड मिलिटरायझेशन इन काश्मिर
बिटवीन डेमोक्रोसी अन्ड नेशन : जेंडर अन्ड मिलिटरायझेशन इन काश्मिर सिमा काझी लिखित् पुस्तक २००९ या वर्षी प्रसिद्ध झाले. सदरील पुस्तकात राष्ट्र आणि लोकशाहीwww.dictionary.com/browse/democracy यांच्या संरक्षणासाठी झालेल्या लष्करीकरणात आणि अराजक परिस्थितीच्या रेट्यात स्त्रिया कशा प्रकारच्या वास्तवास तोंड देतात आणि त्यावेळी लिंगभावwww.unipune.ac.in/snc/womens_studies_centre/wsc.../publications.htm[permanent dead link] या संकल्पनेचे काय फलित होते. या विषयी अभ्यासात्मक मांडणी केली आहे.
प्रस्तावना
संपादनप्रस्तुत पुस्तक सीमा काझी यांनी लिहिले असून पी एच डी प्रबंधाचे पुस्तक २००९ या वर्षी प्रकाशित झाले. सदरील पुस्तकात राष्ट्र आणि लोकशाही यांच्या संरक्षणासाठी झालेल्या लष्करीकरणात आणि अराजक परिस्थितीच्या रेट्यात स्त्रिया कशा प्रकारच्या वास्तवास तोंड देतात आणि त्यावेळी लिंगभावwww.unipune.ac.in/snc/womens_studies_centre/wsc.../publications.htm[permanent dead link] या संकल्पनेचे काय फलित होते या संधर्भात लेखिका लिहितात. काश्मीर प्रश्न सोडविण्यासाठी करण्यात आलेले राजकीय प्रयत्न स्थगीत झाले आहेत. फुटीरतावादाच्या विविध आवाजांना दिल्लीकडून जो कडक प्रतिसाद मिळाला त्यामुळे असे घडले. काश्मीरचा प्रश्न केवळ लष्करीकरणाने सुटणार नाही, असे भारतीय प्रशासन मानत असले तरीही काश्मीर खोऱ्यात सर्वाधिक लष्करीकरण झाले आहे. लष्करीकरणामुळे भारतीय प्रशासन किंवा काश्मिर यांना सुरक्षा न मिळाल्याने दहशतवादी कारवायांमुळे काश्मीर ही एक मानवी शोकांतिका ठरली आहे. भारत आणि पाकिस्तानने क्षेत्रिय काळापेक्षा काश्मीरवर आधारित भविष्य अशी कल्पना करून काश्मीर आणि भारताची पुर्नकल्पना केली पाहिजे असे लेखिका मांडणी करतात. या "पुर्नघटीत" काश्मीरमुळे भारत आणि पाकिस्तानमधील हिंसाचाराला आळाबसून दक्षिण आशियामधील लष्करीकरणापासून सुटका होईल असे काझी म्हणतात. गेल्या दोन दशकातील जम्मू - काश्मीर मधील लष्करीकरणात काश्मिरी दहशतवादी आणि भारतीय फौजा यांच्या सहभागाचा आढावा पुस्तकात घेतला आहे.
ठळक मुद्दे
संपादन1.काश्मीर प्रश्न सोडविण्यासाठी करण्यात आलेले सर्व राजकीय प्रयत्न स्थगीत झाले आहेत.
2.प्रस्तुत संघर्षात लिंगभावाचा दृष्टीकोन कसा नजरेआड केला जातो याचे विश्लेषण केले आहे.
3.लष्करीकरणामुळे भारतीय प्रशासन किंवा काश्मिर यांना सुरक्षा न मिळाल्याने दहशतवादी कारवायांमुळे काश्मीर ही एक मानवी शोकांतिका ठरली आहे.
4.भारत आणि पाकिस्तानने क्षेत्रिय काळापेक्षा काश्मीरवर आधारित भविष्य अशी कल्पना करून काश्मीर आणि भारताची पुर्नकल्पना केली पाहिजे असे लेखिका मांडणी करतात.
याशिवाय या पुस्तकात प्रस्तुत संघर्षात लिंगभावाचा दृष्टीकोन कसा नजरेआड केला जातो याचे विश्लेषण केले आहे. "लिंगभावाचे सामाजिक नाते हे काश्मिरमधील लष्करीकरणाचा परिणाम नसुन तो लष्करीकरणाचा प्रमुख घटक आहे," असे मत लेखिका मांडतात. विविध स्वकथने आणि मुलाखती यांच्या आधारे लेखिका काश्मिरी स्त्रियांच्या लष्करीकरणातील राजकीय अनुभवाचे रेखाटन करते. हा संघर्ष स्त्रियांच्या आई, बायको आणि बहिण या पारंपारिक भूमिकेवरच आधारित असल्याचे लेखिका दाखवून देते. भारतीय लष्कराने काश्मिरी अतिरेक्यांविरुद्ध चालविलेल्या मोहिमेच्या संदर्भात हे ठळकपणे जाणवते. काश्मिरी स्त्री या सर्वांच्या केंद्रभागी असली तरी तिचा राजकीय सहभाग मर्यादितच आहे. काश्मिरी दहशतवादी नेतृत्व आणि काश्मिरी स्त्रिया यांच्यातील नाते आणि काश्मीर मधील कर्मठ पितृसत्ताकopac.tiss.edu/cgi-bin/koha/opac-detail.pl?biblionumber=264315.. समाज या दोन्हीकडे हीच समान परिस्थिती असल्याचे लेखिका विशेषत्वाने मांडणी करतात. काश्मिरमधील जाहीर निदर्शनामध्ये काश्मिरी स्त्रियांनी संदेश वाहक, परिचारिका आणि पाठीराखे अशा भूमिका बजावल्या. नैतिक आणि परिस्थितीजन्य पाठबळ देण्याचे काम करूनही काश्मिरी स्त्रिया कधीही अलगातावादी पक्षांच्या निर्णायकस्थानी अजून तरी आलेल्या नाहीत. या गटांनी कधीही स्त्रियांचे प्रश्न आणि चिंता लक्ष दिले नाही. याउलट दहशतवादी स्त्रियांवरील लैंगिक आणि शारीरिक अत्याचारात गुंतल्याचे दिसून येते.
काश्मीरमधील भारत आणि पाकिस्तानमधील हिंसाचार आणि स्त्रिया यावरील विपुल साहित्य प्रसिद्ध होत आहे आणि यामध्ये स्त्री अभ्यासकांचा मोठा सहभाग आहे , असे असले तरी सीमा काझी यांच्या या पुस्तकाचे विशेष महत्त्व आहे, कारण लेखिकेने लिंगभावाचा दृष्टीकोन आणि स्त्रियांच्या सामाजिक कथनांचा उपयोग केला आहे. यातुन लेखिका राष्ट्रराज्य संकल्पनेतील पितृसत्ताक प्रभावाचे वर्णन करतात. आणि काश्मीरच्या वैभवशाली आणि टिकून राहणाऱ्या सांस्कृतिक परंपरांच्या आधारे काश्मीरच्या पर्यायी स्वप्नांची उभारणी करते. लष्करी राष्ट्रवाद : काश्मिरातील लष्करीकरण हे केवळ तेथील सुरक्षा व्यवस्थेचे लष्करीकरण नसून त्यामध्ये राष्ट्रीय ओळख, सत्ता आणि राष्ट्र व राज्यात फारकत करणे या संकल्पनेचाही अंतर्भाव आहे. सांस्कृतिक आणि वांशिक विविधता जोपासून "राष्ट्रीय एकात्मता" घडविण्याचा प्रयत्न यात दिसतो त्यामुळे राष्ट्रातील एका राज्यात "राष्ट्रनिर्मिती " करण्याची ही घटना आहे. वसाहतकाळोत्तर अनेक समाजामध्ये लष्कराच्या आधारे राष्ट्रउभारणीची प्रक्रिया घडल्याचे लेखिका नमुद करते. काश्मिरात झालेल्या या लष्करीकरणामागे प्रशासनाच्या अण्वस्त्र हस्तगत करण्याच्या महत्त्वकांक्षेचाही भाग आहे. या महत्त्वकांक्षेसाठी विशिष्ट लष्करी हेतु नव्हता तर एका वैविध्यपूर्ण / वैशिष्ट्यपूर्ण राष्ट्राला एका निधर्मी आधुनिकता आणि विवेकनिष्ठ [शास्रीय] आधारावर उभारलेले राष्ट्र बनविण्याचा प्रयत्न होता.
लेखिकेने शेजारी राष्ट्रांची अण्वस्त्रधारी होण्याची आकांक्षानजरे आड केली आहे. काश्मिरातील अशांत परिस्थितीमुळे काश्मीर एक बेपत्ता आणि परागंदा झालेल्या युवकांची आणि न्यायव्यवस्थेबाहेर झालेल्या हत्याकांडांची भूमी झालेले आहे. त्यांच्या विधवा आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या स्त्रिया असुरक्षित अवस्थेत आहेत. त्या लैंगिकदृष्ट्या असुरक्षित आणि तणावात आहेत. लष्कराची नजर, अतिरिक्त सामाजिक दडपण या खेरीज लैंगिक शोषणाच्या शक्यता आहेत. त्यामुळे तिथे अस्तिवात असलेल्या लिंगभावात्मक सत्तारचना अधिक बळकट झाल्या आहेत.
अल्लाह टायगर, लष्करे-ए-जब्बार अशा गटांमध्ये स्त्रियांनी सार्वजनिक ठिकाणी पडदा वापरण्याची सक्ती दिसून येतात. काश्मीर मधील स्त्रिया, लहान मुले, पुरुष अशा सर्वांनाच वेगवेगळ्या बाबींना सामोरे जावे लागते.
महत्त्वाच्या संकल्पना
संपादनDemocracy, Nation, Gender, Militarization, Politics, Separatism, Violence, Patriarchy, Emasculate, Nation-state
प्रतिसाद किंवा योगदान
संपादन1. Aditi Bhaduri, Marginalised kingpins: 'Between Democracy and Nation' by Seema Kazi September 2009.
2. www.jnu.ac.in/cslg/.../20-Law%20Governance%20(Seema).pd
3. https://www.bookdepository.com/Between-Democracy-Nation-Seema-Ka...