ब्राह्मी लिपी
पाली लिपी ही भारतातील उकल झालेली सर्वाधिक प्राचीन लिपी आहे. या लिपीत कोरलेली कांही सांकेतिक लिपी सदृश्य लेखने अनेक स्वरूपात पुरातत्त्वज्ञांना पूर्वीही सापडली आहेत. परंतु या साऱ्यांची उकल होऊनही त्यातून आजवर काहीही अर्थबोध झालेला नाही.
इतिहास
संपादनइसवी सन पूर्व सुमारे तीनशे वर्षांच्या कालापासून कांही लेखनांमधे खूपच साम्य आढळल्याने कांही युरोपीय तज्ज्ञांना त्यात रुची निर्माण झाली आणि त्यांनी या लेखांची उकल करण्याचा प्रयत्न केला. ही उकल प्रथम सर जेम्स प्रिन्सेप या नाणे-तज्ज्ञाने १८३७मध्ये केली. त्यामुळे भारतीय उपखंडातील इतिहासविषयक लेख, व विशेषतः सम्राट अशोकचे शिलालेख आणि स्तंभलेख वाचता येऊ लागले. सम्राट अशोकापूर्वी देखील या लिपीत कांही लिहिले गेल्याचे संकेत मिळतात. कालांतरात या लिपीमधे अनेक बदल घडून आले. परंतु संपूर्ण उपखंडात लेखनातील लिप्यांमधील असाधारण साम्य सम्राट अशोकाच्या काळात आणि त्यानंतर लगेचचच्या काळात दिसून येते. या लिपीला ब्रिटिश तज्ज्ञांनी अशोक पाली लिपी असे नाव दिले. या कालखंडानंतर भारतात खऱ्या अर्थाने लेखन शास्त्राचा विकास होत गेला. याच लिपीच्या मातृत्वाने या उपखंडात अनेक लिप्या जन्मल्या. आज हीच पाली लिपी भारतीय उपखंडातील सर्व लिप्यांची जननी म्हणून ओळखली जाते.[ संदर्भ हवा ]
पाली लिपीत स्वर व व्यंजनांना स्वतंत्र चिन्हे आहेत. परंतु व्यंजनाला जोडून येणारा स्वर मात्र असा सुट्या चिन्हाने न लिहिता व्यंजनालाच एका लहान जोडूनच लिहिला जातो. देवनागरी लिपीतील या लहान चिन्हांना मराठीत काना, मात्रा, वेलांटी आणि उकार असे म्हणतात. पाली लिपीतही तसाच काहीसा प्रकार आहे.
जेव्हा दोन किंवा अधिक व्यंजनांचा उच्चार एकत्रित केला जातो तेव्हा पहिले आणि दुसरे व्यंजन एकाच उभ्या प्रतलात लिहिली जातात. मराठीत या संरचनेला जोडाक्षर म्हणतात.
या लिपी वैशिश्ट्यांना इंग्ग्रजीमध्ये Abugida किंवा Alphasyllabary म्हणतात.
पाली भाषा लिहिण्यासाठी पाली लिपीत ८ स्वर, ३२ व्यंजने आणि एक लहान अनुनासिक चिन्ह अशी ४१ चिन्हे होती. पण पाली आणि प्राकृत भाषांबरोबरच पुढील कालावधीत विकास पावलेल्या भाषांसाठी या लिपीत ऐ, औ हे दोन स्वर आणि श, ष ही दोन नवी व्यंजने लिहिण्यासाठी नवी चिन्हे योजण्यात आली. अशा प्रकारे विकसित झालेल्या पाली लिपीत एकूण १० स्वर, ३४ व्यंजने आणि एक अनुस्वार अशी ४५ चिन्हे आहेत.
वर्णांचे वर्गीकरण
संपादनकण्ठ्य - क, ख, ग, घ, ङ, अ, ह, आ हे पडजीभ व जिभेची मागची बाजू यांच्या संयोगातून निर्माण होणारे वर्ण-
तालव्य - च, छ, ज, झ, ञ इ, य, श, जिभेचा स्पर्श वरचे दात व टाळू या मध्ये होऊन त्यायोगे निर्माण होणारे वर्ण.
मूर्धन्य - ट, ठ, ड, ढ, ण, र, ष, ळ हे जिभेचा टाळूला स्पर्श होऊन त्यायोगे निर्माण होणारे वर्ण.
दन्त्य - त, थ, द, ध, न, ल,स हे जिभेचा दातांना स्पर्श झाल्यावर निर्माण होणारे वर्ण, जसे -
ओष्ठ्य - प, फ, ब, भ, म, उ, ओ, औ, हे दोन्ही ओठांमधून निर्माण होणारे वर्ण’
आकार
व्यंजनांना “आ” जोडताना, म्हणजेच काना लिहिताना व्यंजन अक्षरात असलेल्या वरच्या बाजूस जाणाऱ्या उभ्या रेषेला उजव्या बाजूस जाणारी रेषा काढली जाते.
Pali लिपीतील ३४ व्यंजनांपैकी १३ व्यंजनांना वरच्या बाजूस जाणारी उभी रेषा नाही, म्हणून या व्यंजनांच्या शिरोभागास उजव्या बाजूस स्पर्शून उजव्या बाजूस जाणारी रेषा काढली जाते. ज, ठ, थ, ब या व्यंजनांना कधी कधी ही काना रेषा उजव्या बाजूच्या मध्यातूनही काढली जाते. मात्र ण या व्यंजनास मात्र काना रेषा उजव्या बाजूच्या मध्यातूनच काढली जाते.
आकार
इकार - ईकार
व्यंजनाला इकार जोडण्यायसाठी प्रथम काना लिहिला जातो आणि नंतर त्या काना-रेषेच्याच्या उजव्या टोकाकडून वर जाणारी एक लहान रेषा काढली जाते.
काना लिहिण्याच्या स्थाना संबंधीची पद्धत इकार लिहितानाही सारखीच असते.
ईकार लिइण्यासाठी इकाराच्या एका उभ्या रेषेऐवजी समांतर दोन उभ्या रेषा काढतात.
उकार - ऊकार
व्यंजनास उकार जोडण्यासाठी खालच्या बाजूस जाणाऱ्या उभ्या रेषेच्या खालच्या टोकाकडून उजव्या बाजूस जाणारी एक लहान आडवी रेषा काढली जाते. व्यंजन अक्षरात उभी रेषा नसल्यास खालच्या बाजूस अगदी लहान उभी रेषा काढून तिला उजव्या बाजूस जाणारी आडवी रेषा काढली जाते.
ऊकार काढण्यासाठी उकाराच्या रेषेला समांतर आणखी एक रेषा काढली जाते. इवलेसे|ब्राम्ही व्यंजनांचे ए-कार इवलेसे|पाली व्यंजनांचे ऐ-कार एकार - ऐकार
व्यंजनाला एकार जोडण्यासाठी काना देण्यासाठी जशी उभ्या रेषेच्या शिरोभागातून किंवा अक्षराच्या डाव्या शिरोभागातून डावी कडून उजवीकडे जाणारी एक रेषा काढतात तशीच परंतु उभ्या रेषेच्या शिरोभागातून किंवा उजव्या शिरोभागातून उजवीकडून डावीकडे जाणारी लहान रेषा काढली जाते. या रेषेला मात्रा रेषा म्हणता येईल.
व्यंजन अक्षराला ऐकार जोडण्यासाठी एकारासाठी काढलेल्या रेषेला समांतर आणखी एक रेषा काढली जाते. म्हणजेच दोन मात्रा रेषा काढल्या जातात.
ओकार - औकार
आपण मागील पानांतून काना आणि मात्रा रेषा पाहिल्या आहेतच. एक काना आणि एक मात्रा रेषा एकत्रपणे काढल्या तर तो व्यंजनाचा ओकार होतो तर एक काना आणि दोन मात्रा रेषा एकत्रपणे काढल्या तर व्यंजनाचा औकार होतो.
उजव्या बाजूस शिरोभागी एक ठिपका °
काढून त्या व्यंजनाचे अनुनासिक रूप होते.
जोडाक्षरे
जेंव्हा एकापेक्षा अधिक व्यंजनांचा उच्चार एकमेकांस जोडून केला जातो तेंव्हा त्या अक्षराला जोडाक्षर म्हणावे. प्राकृत भाषेत जोडाक्षर असलेले शब्द फारच कमी आहेत. जी जोडाक्षरे आहेत त्यांचे सामान्य वर्गीकरण करता येईल. प्राकृत भाषेतील व्यंजनांचे कंठ्य, तालव्य, मूर्धन्य, दंतव्य, ओष्ठ्य असे पाच वर्गात वर्गीकरण केलेले आपण पाहिले आहे. यांना अनुक्रमे क-वर्ग, च-वर्ग, ट-वर्ग, त-वर्ग, प-वर्ग असेही म्हणतात. याच वर्गवारीच्या आधारावर जोडाक्षरांची वर्गवारी होऊ शकते.
१. एकाच व्यंजनाचा दुहेरी उच्चार. जसे सक्क, पच्चुपन्न, संकप्प, अत्त ....
ब्राम्ही लिपीत ही जोडाक्षरे शक्यतो लिहिली जात नव्हती. त्याऐवजी एकच अक्षर लिहिले जात असे. वाचताना व बोलताना त्या व्यंजनाचा दुहेरी उच्चार केला जाई.
२. एकाच वर्गातील पहिले व दुसरे किंवा तिसरे व चौथे व्यंजन जोडलेले असणे. जसे दुक्ख, गच्छ, मज्झिम, दीट्ठी, सब्बत्थ, बुद्ध, पुप्फ, गब्भ ....
ब्राम्ही लिपीत असे शब्द लिहिताना जोडाक्षर लिहिले जात नसे. जोडून येणाऱ्या उच्चारातील दुसरे अक्षर लिहिले जाई. मात्र वाचताना व बोलताना मात्र दोन्ही व्यंजनांचा उच्चार एकत्रितपणे केला जाई. जसे ... लुंबिनी स्तंभावरील अशोकाच्या लेखात बुद्ध हा शब्द बुध असा लिहिला आहे.
३. भिन्न वर्गातील दोन व्यंजनांचा उच्चार एकत्रित पणे होत असेल तर मात्र असे उच्चार असलेले शब्द जोडाक्षराने लिहिले जात असत.
या प्रकारच्या लेखनपद्धतीमुळे अशोकाच्या काळात ब् जोडाक्षरे क्वचितच लिहिली जात. किंबहुना त्या काळात प्रचलित प्राकृत भाषांमधील शब्दांमधे भिन्न वर्गातील अक्षरे जोडून होणाऱ्या जोडाक्षरयुक्त शब्दांचे प्रमाण फारच कमी होते.
सम्राट अशोकाच्या शिलालेखात खालील जोडाक्षरयुक्त शब्द आले आहेत.
पजुहितव्यं, समाजम्हि, आराभित्पा, नास्ति, सुस्रुसा, संस्तुत, धंमानुसस्टिया, द्वादस, परात्रा, स्वामिकेन, सम्यपतिपती, मोख्यमतं, अधिगच्य, सक्यमुनी, अभ्युंनमिसति ....
जोडाक्षरात ज्या अक्षराचा उच्चार आधी होतो ते अक्षर प्रथम लिहिले जाते आणि त्याच अक्षराला स्पर्श करून खालच्या बाजूस दुसऱ्या उच्चाराचे अक्षर लिहिले जाते. जसे ... द्व लिहिताना आधी द आणि त्याला जोडून खाली व लिहिला जातो.
पाली लिपीतील जोडाक्षरांची उदाहरणे : . [[चित्र:जोडाक्षरे.jpg|इवलेसे पाली]