बाहुलीचा हौद हा पुण्यातील शुक्रवार पेठेतील दगडूशेठ दत्त मंदिराजवळ असलेला हौद होता. दगडूशेठ गणपती हा पूर्वी बाहुली हौदाचा सार्वजनिक गणपती म्हणून प्रसिद्ध होता.

पुण्यातील शल्यविशारद डॉ.विश्राम घोले यांनी आपली मुलगी काशीबाई तथा बाहुली हिच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा हौद बांधला होता. हौदाच्या मध्यभागी काशीबाईचे बाहुलीरूपातले शिल्प होते. हा हौद पहिल्यापासूनच सर्व जातिधर्मातील लोकांसाठी खुला होता.[][][]

महात्मा फुले यांच्यापासुन प्रेरणा घेऊन डॉ.विश्राम घोले यांनी स्त्री शिक्षणाचा प्रसार करायला सुरुवात केल होती. सुरुवात आपल्या घरातुन करण्यासाठी त्यांनी आपली लाडकी कन्या बाहुली. हिला शिकवण्यास सुरुवात केली. बाहुली खरोखरच नावाप्रमाणे बाहुली होती. तिचे वय अवघे ६-७ वर्ष होते.[][][]

अतिशय हुशार कुशाग्र आणि चुणचुणीत.बाहुलीच्या शिकण्याला डॉ. घोले यांचे पाठबळ असले तरी घरातील ज्येष्ठ व्यक्ती, महिलांना त्यांची ही कृती पूर्ण नापसंत होती, किंबहुना प्रखर विरोध होता.अनेकदा डॉ.घोले यांना समजविण्याचा प्रयत्न जातीतील मान्यवरांनी केला. जातीतून बहिष्कृत करण्याची धमकी दिली.[][][]

पण डॉ.घोले यांनी कुठल्याही अडचणीला भीक घातली नाही.शेवटी काही नतद्रष्ट नातेवाईक व्यक्तिंनी काचा कुटुन घातलेला लाडू बाहुलीस खावयास दिला. ती अश्राप पोर ती काचांचा लाडू खाल्ल्यामुळे अंतर्गत रक्तस्राव होऊन मृत्युमुखी पडली.[][][]

स्त्री शिक्षणाचा हा पहिला ज्ञात बळी होय. आपल्या लाडक्या लेकीच्या स्मरणार्थ डॉ. घोल्यानी शुक्रवार पेठेत बाहुलीचा हौद बांधला आणि तो सर्व जातीधर्मातील लोकांसाठी खुला ठेवला.त्याचा लोकार्पण सोहळा शिंपी समाजातील थोर सुधारक दादा भुतकर यांच्या हस्ते भाऊबीजेच्या दिवशी ठेवल्याची नोंद आहे. पण इतिहासात बाहुलीच्या जन्म मृत्यूच्या तारखेची नोंद मात्र आढळत नाही.

काळ बदलला. कालपटावरील आठवणी धूसर झाल्या. डॉ. विश्राम घोले यांच्या नावाचा घोले रोड आता सतत वाहनांच्या वर्दळीने धावतपळत असतो. पूर्वी शांत निवांत असलेली शुक्रवार पेठ पुढे व्यापारी पेठ म्हणून गजबजून गेली.

संदर्भ

संपादन
  1. ^ a b c d "कहानी 8 साल की उस बच्ची की जो कुर्बानी देकर सैकड़ों लड़कियों को शिक्षित कर गई". टीव्ही9 हिंदी. १४ एप्रिल २०२४ रोजी पाहिले.
  2. ^ a b c d "विविधा: डॉ. विश्राम रामजी घोले". dainikprabhat.com. १४ एप्रिल २०२४ रोजी पाहिले.
  3. ^ a b c d "8 साल की इस लड़की की मौत के बाद मिला था भारतीय महिलाओं को शिक्षा का अधिकार, हुआ था पढ़ने का विरोध". indiatimes. १४ एप्रिल २०२४ रोजी पाहिले.