बळवंत परशुराम आपटे
(बाळ आपटे या पानावरून पुनर्निर्देशित)
बळवंत परशुराम आपटे उर्फ बाळ आपटे हे विधिज्ञ, राज्यसभेचे खासदार व भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व भाजपच्या संघटनात्मक उभारणीत आपटे यांचा मोठा वाटा होता. १९९६ ते १९९८ या काळात भाजप-सेना सरकार सत्तेवर असताना महाराष्ट्राचे अतिरिक्त ॲडव्होकेट जनरल म्हणून काम केले होते.