बाळाजी प्रभाकर मोडक
विज्ञानविषयक लेखक, इतिहासकार, इतिहासविषयक तारखांचे जंत्रीकार
बाळाजी प्रभाकर मोडक (२२मार्च, १८४७:आचरे, सिंधुदुर्ग जिल्हा, महाराष्ट्र - २ डिसेंबर, इ.स. १९०६) हे मराठी लेखक होते. त्यांनी विज्ञान व इतिहास ह्या विषयांवर ग्रंथलेखन केले.
बाळाजी प्रभाकर मोडक | |
---|---|
जन्म नाव | बाळाजी प्रभाकर मोडक |
जन्म |
२२ मार्च, १८४७ आचरे , सिंधुदुर्ग |
मृत्यू | २ डिसेंबर, इ.स. १९०६ |
शिक्षण | पदवी कलाशाखा |
साहित्य प्रकार | विज्ञान , इतिहास |
वडील | प्रभाकर मोडक |
ग्रंथसंपदा
संपादनविज्ञान विषयक पुस्तके
संपादन- रसायनशास्त्र - पूर्वार्ध, १८७५, १८७६
- रसायनशास्त्र - उत्तरार्ध, १८८३
- रसायनशास्त्राची मुलतत्त्वे, १८८९
- रसायनशास्त्राची मुलतत्त्वे, १८९२
- सृष्टिशास्त्राची मूलतत्त्ववे - पूर्वार्ध भाग पहिला, १८८०
- सृष्टिशास्त्र किंवा पदार्थविज्ञानशास्त्र - पूर्वार्ध, १८८१
- सृष्टिशास्त्र किंवा पदार्थविज्ञानशास्त्र - उत्तरार्ध, १८९३
- ग्योनोकृत पदार्थविज्ञानशास्त्राची मूलतत्त्वे, १८९६
- ग्योनोकृत सृष्टिशास्त्र किंवा पदार्थविज्ञानशास्त्र ह्याची मूलतत्त्वें - भाग पहिला, १८९९
- ग्योनोकृत सृष्टिशास्त्र किंवा पदार्थविज्ञानशास्त्र ह्याची मूलतत्त्वें - भाग दुसरा, १९००
- पदार्थवर्णन - भाग पहिला, १८९१, १९०५
- पदार्थवर्णन - भाग दुसरा, १८९२
- बालबोध यंत्रस्थितिशास्त्र, १८९७
- बालबोध यंत्रस्थितिशास्त्र ह्या वरील प्रश्न व उदाहरणे, १८९९
- यंत्रशास्त्र - पूर्वार्ध, १८८७
- प्राणिशास्त्र, १९२३
- आरोग्यमार्ग, १८८८, १९०४
- आरोग्यशास्त्र - भाग एक
- आरोग्यशास्त्र - भाग दोन, १८९४
- उद्भिज लाल रंग, १८८८
- कोल्हापूर इलाख्याचा औद्योगिक पाहणीचा रिपोर्ट, १८९६
इतिहास विषयक पुस्तके
संपादन- कोल्हापूर व कर्नाटक प्रांतांतील राज्ये व संस्थाने ह्यांचा इतिहास पूर्वार्ध - भाग पहिला, १८७७
- कोल्हापूर व कर्नाटक प्रांतांतील राज्ये व संस्थाने ह्यांचा इतिहास उत्तरार्ध - भाग दुसरा - कर्नाटक प्रांतांतील संस्थानांचा इतिहास ( मुधोळ , रामदुर्ग , नरगुंद , पटवर्धन सरदार ह्यांची संस्थाने , निपाणी , कित्तूर , सावनूर ह्यांचा इंग्रजी अंमलापर्यंतचा इतिहास )१८८०
- हिंदुस्थानांतील मुसलमानी राज्याचा संक्षिप्त इतिहास, १८८२
- कोल्हापूर व कर्नाटक प्रांतांतील राज्ये व संस्थाने ह्यांचा इतिहास उत्तरार्ध - भाग पहिला – कोल्हापूर राज्याचा इतिहास (इ.स. १६५९ ते १८१२ पर्यंतची माहिती) १८८६, १९२५
- कोल्हापूर व कर्नाटक प्रांतांतील राज्ये व संस्थाने ह्यांचा इतिहास पूर्वार्ध - भाग दुसरा ( विजापूरच्या आदिलशाही घराण्याचा इतिहास ' बुसातिने सलातीन' व इतर अनेक फारसी ग्रंथ ह्यांच्या आधारें ; साहाय्यक - दिनकर गोविंद वझे ), १८८६
- शक व सन ह्यांची तिथी व तारीखवार जंत्री (शालिवाहन , विक्रम , राजशक , सुरू सन , फसली , हिजरी आणि इसवी साल , महिना , तिथि किंवा तारीख व वार दाखविणारी जंत्री; शके १६५० पासून शके १८११ पर्यंत ) १८८९
- शक व सन - पुरवणी शके व सन ह्यांची तिथी व तारीखवार जंत्री, १८९४ पासून १९१३ पर्यंत, १९०८
- मुंबई इलाख्याचे ग्याझिटिअर - पुस्तक २४ - कोल्हापूर ह्याचे मराठी भाषांतर, १८९०
- दक्षिणेतील मुसलमानी राज्यांचा इतिहास - भाग पहिला - बाहामनी उर्फ ब्राह्मणी राज्याचा इतिहास (फेरिस्ता ह्या इतिहासकाराच्या ग्रंथाच्या आधारें) १८९१
- दक्षिणेतील मुसलमानी राज्यांचा इतिहास - भाग तिसरा (फेरिस्ता व दुसरे फारसी ग्रंथ ह्यांच्या आधारें ; अहमदनगर , गोवळकोंडे , बेदर आणि वऱ्हाड येथील निजामशाही , कुतुबशाही , बेरीदशाही आणि इमादशाही ह्या मुसलमानी राज्यांचा इतिहास), १८९१
- कोल्हापूर राज्याचा इतिहास - भाग दुसरा ( सन १८१३ - १८८२ ); १८९३; पुणे
- कोल्हापूर प्रांताचा संक्षिप्त इतिहास, १९०९
- दाभाडे सेनापति ह्यांची हकीगत(काव्येतिहाससंग्रह)
इतर
संपादन- कोल्हापूर प्रांताचे संक्षिप्त वर्णन, १८७३, १८८६
- मराठी भाषेच्या द्वारे उच्च शिक्षण देण्याची आवश्यकता (मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय वार्षिकोत्सव - १९०४ , अध्यक्षीय भाषण )१९०५
- प्रो. बाळाजी प्रभाकर मोडक ह्यांचे चरित्र - ग.ब.मोडक, १९३१