बाळशास्त्री हुपरीकर

बाळशास्त्री अण्णाबुवा हुपरीकर (?? - ७ ऑगस्ट, इ.स. १९२४) हे कोल्हापूर येथे राहणारे संस्कृत पंडित व लेखक होते. ते वेदान्तशास्त्राचे आणि ज्ञानदेव- शंकराचार्य यांच्या साहित्याचे अभ्यासक व भाष्यकार होते. मराठी कवी रेंदाळकर हे त्यांच्याकडेच 'सिद्धान्त कौमुदी' शिकले.

बाळकृष्ण हुपरीकरांनी लिहिलेले ग्रंथ

संपादन
  • श्रीअनुभवामृत पर्यबोधिनी टीका (१८९८)
  • (हर्बर्ट स्पेन्सरसाहेबांची) अज्ञेय मीमांसा व आर्य वेदान्त
  • ग्रंथमाला (सहलेखक - विष्णू गोविंद विजापूरकर)
  • श्रीमद्भगवद्गीता अथवा ज्ञानयोगशास्त्र
  • विद्यारण्य व ज्ञानेश्वर यांच्या वेदांतील मतांचे तात्पर्य (१९०२)